Restless Manipur sakal
देश

Restless Manipur : मणिपूरमधील भयकथा संपेनात; विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड

मणिपूरमधील महिलांवरील बलात्काराच्या नवनवीन भयकथा समोर येऊ लागल्या आहेत.

पीटीआय

इंफाळ - मणिपूरमधील महिलांवरील बलात्काराच्या नवनवीन भयकथा समोर येऊ लागल्या आहेत. विष्णुपूर येथील एका ३७ वर्षीय विवाहितेने बुधवारी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये ३ मे रोजी चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे म्हटले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर विष्णुपूर पोलिस ठाण्यामध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता त्याच दिवशी तो चुराचांदपूर पोलिस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये अज्ञात कुकी हल्लेखोरांविरोधात सामूहिक बलात्कार, महिलेचा विनयभंग आणि हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मणिपूर सरकारने या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या माहितीमध्ये राज्यातील हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ६ हजार ५२३ ‘एफआयआर’ दाखल झाल्याचे म्हटले आहे.

महिलांचा मशाल मोर्चा

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच मणिपूर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी करत आज शेकडो महिलांनी इंफाळ खोऱ्यामध्ये मशाल मोर्चा काढला होता. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने प्रादेशिक ऐक्याचे संरक्षण करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करावा आणि तो संसदेकडे पाठवावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

कुकी समुदायासाठी वेगळे प्रशासन व राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या (एनआरसी) अंमलबजावणीलाही त्यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते ओकराम इबोबीसिंह यांनीही तातडीने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित बोलवावे अशी मागणी केली आहे. हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

आमदारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मणिपूरमध्ये शांतता आणि सुरक्षेचे वातावरण तयार करण्यासाठी निशस्त्रीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने राबविली जाणे गरजेचे असल्याची मागणी राज्यातील चाळीस आमदारांनी केली असून यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यातील बहुसंख्य आमदार हे मैतेई समुदायाचे आहेत.

कुकी बंडखोरांसोबतच्या मोहिमेला स्थगिती देणारा करार रद्द करावा, राज्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेची (एनआरसी) अंमलबजावणी करावी तसेच स्वायत्त जिल्हा परिषदांना अधिक मजबूत केले जावे, अशा मागण्या त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. कुकी समुदायाला वेगळे प्रशासन द्यायला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT