Revanth Reddy esakal
देश

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Vice President Nomination: ‘’…त्यांना उपराष्ट्रपती बनवलं तर तुमची काही पाप माफ होतील." असं म्हणत केंद्र सरकावर साधला निशाणा

Mayur Ratnaparkhe

Revanth Reddy suggests Bandaru Dattatreya for Vice President: तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांनी बुधवारी माजी केंद्रीयमंत्री,  माजी राज्यपाल आणि तेलंगणाचे ओबीसी नेते बंडारू दत्तात्रेय यांना भारताचे उपराष्ट्रपती बनवण्याची मागणी केली. ते म्हणाले की,  तेलगु ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याने आणि स्थानिक भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे पद तेलंगणाला देण्यात यावे. दरम्यान, त्यांनी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याला दुर्दैवी म्हटले आहे.

रेवंत रेड्डी म्हणाले, "पुढील उपराष्ट्रपती तेलंगणाचा असावा. तेलंगणाला त्याचे अधिकार आहेत. तुम्ही तेलंगणातील लोकांवर इतका अन्याय करू शकत नाही. हिंदीनंतर तेलगू ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली जाणारी भाषा आहे आणि त्यानंतर बंगाली भाषा येते. आमच्या लोकांवर अन्याय झाला आहे.’’

पत्रकारांशी बोलताना रेड्डी म्हणाले, "मी एनडीए सरकारने बंडारू दत्तात्रेय यांची भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. जर दत्तात्रेय यांना उपराष्ट्रपती बनवले तर तुमचे काही पाप माफ होतील."

रेड्डी म्हणाले की,  त्यांनी दत्तात्रेय यांचे नाव प्रस्तावित केले कारण आजकाल ओबीसींबद्दल खूप चर्चा होत आहे आणि ओबीसी समुदायातून येणाऱ्या दत्तात्रेय यांना राज्यपालपदावरून काढून टाकण्यात आले आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना एम. वेंकय्या नायडू यांचा उल्लेख करत रेड्डी म्हणाले, "त्यांनी एका तेलुगू भाषिक व्यक्तीला दिल्लीहून घरी परत पाठवले. यानंतर त्यांनी बंडारू दत्तात्रेय यांना राज्यपालपदावरून आणि नंतर बंदी संजय यांना तेलंगणा भाजप अध्यक्षपदावरून काढून टाकले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT