ADR Report 2025 reveals the richest and poorest Chief Ministers of India with detailed wealth declarations. esakal
देश

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

ADR Report on Most Richest and Poorest CM : जाणून घ्या, सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची आणि सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांची किती आहे संपत्ती?

Mayur Ratnaparkhe

Richest Chief Minister in India: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टमध्ये देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीनुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये की कोणाकडे किती मालमत्ता आहे. या यादीत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपासून ते देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या मालमत्तेचा डेटा शेअर करण्यात आला आहे.  ही यादी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे तब्बल ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू असून त्यांची संपत्ती ३३२ कोटी रुपये आहे. ADR ने जाहीर केलेल्या या यादीत, हे दोन मुख्यमंत्री अब्जाधीश आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या ताज्या रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांनंतर तयार केलेल्या ३१ मुख्यमंत्र्यांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत,  त्यांची मालमत्ता १५ लाख रुपयांपेक्षा थोडीशी जास्त आहे.

ADR अहवालात ३१ मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १,६३० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. ADR अहवालात असे म्हटले आहे की ममता बॅनर्जी यांनी १५ लाख रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे, तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता ५५ लाख रुपयांची आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे १ कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त संपत्ती असलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी मालमत्ता असलेले मुख्यमंत्री आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT