crime news esakal
देश

Road Rage: हॉर्न देऊनही लक्ष दिलं नाही, अल्पवयीन मुलीने केली कर्णबधिराची हत्या

ओव्हरटेक करण्यासाठी या गाडीला हॉर्न वाजवला होता पण त्याला ऐकायला येत नसल्यामुळे त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : रस्त्यावरून जाताना एका गाडीला हॉर्न वाजवूनही प्रतिसाद न दिल्याने एका पंधरा वर्षाच्या मुलीने कर्णबधिर व्यक्तीची हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील रायपूर येथे घडली आहे. या घटनेननंतर सदर अल्पवयीन मुलगी घटनास्थळावरून फरार झाली होती पण पोलिसांनी तिला घटनास्थळावरून २० किमी अंतरावरून ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या घटनेविषयी अधिक माहिती सांगताना आझाद चौक पोलिस स्टेशनच्या प्रभारी आश्विनी राठोड यांनी सांगितलं की, सुदामा लादेर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून हा कर्णबधिर होता. तो आपल्या सायकलवर काहीतरी सामान ठेवत होता. त्यावेळी आरोपी मुलगी तिच्या आईबरोबर स्कुटीवरून येत होती. तिने ओव्हरटेक करण्यासाठी या व्यक्तीला हॉर्न वाजवला होता पण त्याला ऐकायला येत नसल्यामुळे त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर ही मुलगी गाडीवरून खाली उतरून त्याच्याजवळ गेली आणि त्याला ओरडली. पण त्यानंतरही सुदामा नावाच्या व्यक्तीने प्रतिसाद न दिल्याने त्या मुलीने चाकू काढत त्यावर हल्ला करत त्याचा गळा कापला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण त्याचा रस्तातच मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी मुलीने तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तिला घटनास्थळापासून २० किमी अंतरावर पकडलं असून अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या गुन्ह्याचा रेकॉर्ड विचारला असता ती अल्पवयीन असल्यामुळे तिचा रोकॉर्ड देता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी, पण ‘या’ भागांत मुसळधार सरी कोसळणार; आज तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Indian Fishing Boat: भारतीय बोटीला अपघात; ११ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले, खवळलेल्या समुद्रात मध्यरात्री अनुभवला थरार..

Maratha Reservation: मनोज जरांगे कुणाच्या अजेंड्यावर काम करत होते? लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप, संविधानाला आव्हान देऊ नका

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: जात पडताळणी समितीत सरकारचा हस्तक्षेप नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT