Firing Firing
देश

बिहार : लूटमार केल्यानंतर गुन्हेगारांनी फोडले बॉम्ब अन् झाडल्या गोळ्या

विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देत ​​दुकानातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून नेले

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील सिवानमध्ये दरोडेखोरांनी पाच लाख रुपये लुटले. एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याची (Robbery) ही घटना घडली. दरोडा टाकल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांचा स्थानिक तरुणांनी पाठलाग केला असता बॉम्बस्फोट (bombing) आणि अंदाधुंद गोळीबार करून कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले. दरौंडा परिसरातील चांचौरा बाजारात ही घटना घडली. दहशत पसरवण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांनी डझनहून अधिक बॉम्बस्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.

सिवानच्या डिब्बी बाजारमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. याच दुकानाला शनिवारी भरदिवसा गुन्हेगारांनी लक्ष्य केले. दोन दुचाकींवर सहा दरोडेखोर ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले. तिघे बाहेर थांबले तर तीन गुन्हेगार आत शिरले. गुन्हेगारांनी दुकानदार सुशीलकुमार साह यांना बंदूक दाखवून तिजोरी उघडायला लावली. यावेळी दुकानात पाच ते सहा महिलाही होत्या. विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देत ​​दुकानातील सुमारे पाच लाखांचे दागिने (Jewelry theft) लुटून (Robbery) नेल्याचे सुशील यांनी सांगितले.

दुकानात दरोडा (Robbery) झाल्याची माहिती मिळताच लोकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे बाहेर उपस्थित गुन्हेगारांनी बोंबाबोंब सुरू केली. यावेळी दुकानातील दागिने लुटून चोरटे बाहेर आले आणि दुचाकीवरून पळू लागले. स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यावर दरोडेखोरांनी गोळीबार (Firing) व बॉम्बस्फोट (bombing) सुरू केला. तरुणांनी हार न मानता त्यांच्यावर दगडफेक केली. मात्र, दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

यानंतर सीमेला लागून असलेल्या सारणच्या चानचौरा मार्केटमधील दुकानालाही गुन्हेगारांनी लक्ष्य केले. चांचौरा येथे एका गुन्हेगाराला लोकांनी पकडले. सराईत गुन्हेगाराने दोन तरुणांवर पिस्तुलाच्या बटाने हल्ला केला. यात दोन्ही तरुण जखमी झाले. या घटनेने व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT