Priyanka Gandhi esakal
देश

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनंतर पती रॉबर्ट वाड्रा जाणार संसदेत; स्वतःच निवडणूक लढण्याची व्यक्त केली इच्छा

संतोष कानडे

Robert Vadra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून संसदेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर वायनाडमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. प्रियांका गांधी वायनाडच्या जागेवरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दुसरीकडे एका मुलाखतीमध्ये बोलताना, प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी स्वतः बद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे. ते 'एबीपी न्यूज'शी बोलत होते. प्रियांका गांधी वायनाडमधून लढत आहेत, याचा मला आनंद आहे, असंही ते म्हणाले.

'प्रियांका गांधी पोटनिवडणुकीसाठी कशा तयार झाल्या?' या प्रश्नावर उत्तर देताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, प्रियांका गांधी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत. खासदार म्हणून त्यांनी पुढे आलं तर त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल. त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह मीदेखील धरला आणि त्यांनी ते मान्य केलं.

उद्योजक रॉबर्ट वाड्रा पुढे म्हणाले की, प्रियांका वाडनाडमधून निवडणूक लढवत असल्याचा मला आनंद आहे. त्यांनी संसदेत जाण्याची ही योग्य वेळ आहे. माझी ही इच्छा होती की, आधी प्रियांका यांनी संसेद जावं.. मीही मेहनत करत राहणार आणि पुढच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणार.

घराणेशाहीवर बोलताना वाड्रा म्हणाले की, भाजपने आपल्याच घरात ढुंकून बघितलं पाहिजे. त्यांच्या पक्षात घराणेशाहीवाले नेते आहेत. त्यांच्या ४०० पारची वास्तविकता जनतेने दाखवून दिली आहे. भाजपला अयोध्येत पराभव पत्कारावा लागल्याची बोचरी टीका वाड्रा यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

Cancer Treatment: कॅन्सरचा संसर्ग होण्याआधीच थांबवणार सुपर व्हॅक्सीन; उपचारात घडणार क्रांती

खरंच रानू मंडल वेडी झालीय? 5 वर्षात अशी झाली अवस्था, घरात कीडे तर खाण्याचे हाल तरीही, मध्येच हसते, मध्येच रडते

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही...; रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिलसह टीम इंडिया दौऱ्यासाठी रवाना Video Viral

SCROLL FOR NEXT