Uttarkashi Tunnel Rescue eSakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या मजूरांचं मानसिक आरोग्य तपासणार स्वदेशी 'रोबो', मिलिंद राज यांची माहिती

Uttarakhand Tunnel : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १५ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Uttarkashi Tunnel Collapse : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १५ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या मजुरांच्या मानसिक स्वास्थ्याची पाहणी रोबोच्या मदतीने केली जाणार आहे. त्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर येणार असल्याचे रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी सोमवारी सांगितले.

‘ड्रोन मॅन’ अशी ओळख असलेले राज म्हणाले,‘‘सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मानसिक आरोग्य तपासण्यासाठी मी येथे आलो आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. मजुरांच्या मानसिक आरोग्यावर आता रोबो लक्ष ठेवणार आहे. कामगारांच्या आरोग्यावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे.’’ या रोबोटिक तंत्रज्ञानात तीन गोष्टींचा समावेश आहे. वायू शोधण्याच्या यंत्रणेव्यतिरिक्त इंटरनेट सेवाही याद्वारे पुरविली जाते. अडकलेल्या मजुरांच्या जागेपासून १०० मीटर अंतरावरून त्यांच्या आरोग्यावर रोबोद्वारे लक्ष ठेवता येते.

पूर्वी लखनौमध्ये एक इमारत कोसळून होती. त्यानंतर १४ जणांना ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले होते. त्यावेळी वापरलेल्या रोबोटिक यंत्रणेचीच मदत आता घेतली जाणार आहे. यात एक यंत्र असेल आणि आमचे सेंन्सर १०० मीटर पुढे जाईल. त्यामुळे आम्हाला आवश्‍यक माहिती मिळू शकेल,’’ असे राज यांनी सांगितले.

रोबोटिक अभियंता मिलिंद राज हे लखनौचे रहिवासी आहेत. भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम ते करतात. त्यांनी तयार केलेल्या ड्रोनचा वापर भारतीय लष्करात केला जात आहे.

पीएमओचे शिष्टमंडळ उत्तरकाशीत

बचाव मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांचे मुख्‍य सचिव प्रमोदकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज सकाळी उत्तरकाशीला पोहोचले. केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला व उत्तराखंडचे मुख्य सचिव एस.एस.संधू हेही त्यांच्याबरोबर होते. बोगद्यातील बचावकार्याची पाहणी त्यांनी केली. हाताने खोदकाम करण्याच्या पद्धतीचे समर्थन करताना लष्करातील अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग (निवृत्त) म्हणाले, मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिवाय अन्य मार्ग नाही.

काय म्हणाले राज?

  • मजुरांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा कुटुंबाशी संपर्क होणे आवश्‍यक असून त्यासाठी इंटरनेटसारखी सुविधा दिली जाणार.

  • रोबोमध्ये अतिनील किरणांचाही वापर करणार.

  • जंतूंच्या नाशासाठी अतिनील किरणे उपयुक्त. मजूर आजारी पडू नयेत आणि मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी उपयोग.

  • मजुरांना आत ऊन मिळत नाही. याशिवाय अन्य अनेक समस्या आहेत. यामुळे ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले तरी मानसिकदृष्ट्या खचले तर त्यांच्या मानसिक आधार द्यायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT