Rohiqa Chagla  
देश

Cyrus Mistry Dies : पत्नी रोहिका यांचं महत्त्वपूर्ण आवाहन; म्हटलं उद्या सकाळी...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. उद्योग जगतातील तारा निखळल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रोहिका यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

रोहिका मिस्त्री यांनी म्हटलं की, आज कुणीही भेट देण्यासाठी गर्दी करू नये. उद्या सकाळपर्यंत पुढील माहिती देण्यात येईल, अशंही रुहिका यांनी म्हटलं आहे.

सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही त्यांच्या माजी चेअरमनला श्रद्धांजली वाहिली आहे.

५४ वर्षीय सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला येत होते. गाडीत चार जण होते. रविवारी दुपारी हा अपघात झाला. मुंबईपासून 100 किमी अंतरावर पालघरजवळ महामार्गावर मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री व्यतिरिक्त जहांगीर दिनशा पंडोळे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. कार चालवत असताना मुंबईतील डॉक्टर अनायता पांडोळे आणि त्यांचे पती दर्यास पांडोळे जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT