Gurmeet Ram Rahim News esakal
देश

Gurmeet Ram Rahim : डेरा प्रमुख राम रहीमला मिळाला पॅरोल

सकाळ डिजिटल टीम

राम रहीमला सीबीआय न्यायालयानं दोन साध्वींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती.

रोहतक : हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला (Ram Rahim) पॅरोल देण्यात आलाय. रोहतकच्या सुनारिया तुरुंगात (Sunaria Jail Rohtak) बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला जेल विभागानं पॅरोल दिलाय. शुक्रवारी सकाळी राम रहीमला तुरुंगाबाहेर आणण्यात आलं असून, राम रहीमला कडेकोट बंदोबस्तात तुरुंगातून बाहेर काढण्यात आलंय. (Gurmeet Ram Rahim News)

पॅरोलच्या कालावधीत राम रहीम यूपीतील बागपत आश्रमात (Baghpat Ashram) राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. बागपतच्या बरनावा गावात हा आश्रम असून राम रहीमचा कॅम्प (डेरा) आहे. हरियाणा सरकारनं राम रहीमला एका महिन्यासाठी पॅरोल दिलाय. याआधी हरियाणा सरकारनं (Haryana Government) फेब्रुवारीमध्ये राम रहीमला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यादरम्यान सरकारनं राम रहीमच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्याला Z+ सुरक्षा प्रदान केली होती. सुट्टीच्या काळात राम रहीम बहुतेक वेळ त्याच्या गुरुग्राम आश्रमात राहिलाय.

राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी विशेष सीबीआय न्यायालयानं (CBI Court) दोन साध्वींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. पंचकुलातील हिंसाचारानंतर राम रहीमची रवानगी सुनारिया तुरुंगात करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही त्याला शिक्षा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT