Row as returned Kerala diaspora now asked to pay for quarantine 
देश

Coronavirus : क्वारंटाईन होण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : जे लोक परदेशातून केरळमध्ये येत आहेत, त्यांच्याकडून क्वारंटाईन होण्यासाठी पैसे घेण्यात येणार असल्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. त्याशिवाय देशातील विविध भागातून केरळमध्ये आलेले जे लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहणार, त्यांनादेखील क्वारंटाईनसाठीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'लाखोंच्या संख्येने लोक केरळ राज्यात परत येत आहेत. बाहेरुन आलेले जे लोक संस्थात्मक क्वारंटाईन होतील त्यांना पैसे भरावे लागणार आहेत. सरकार एकट्याने या सर्वांचा खर्च उचलण्यासाठी सक्षम नाही. हा नियम सर्वांसाठी लागू नाही. परंतु, परदेशातून येणाऱ्या सर्वांसाठी हा नियम लागू असणार आहे.
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
राज्य सरकारकडून पैसे भरण्यासाठी काही श्रेणी तयार केल जातील. यासाठी कमीत कमी पैसे आकारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशातील अनेक राज्यातून, परदेशातून येणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने केरळ राज्यात येण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्ही परत येणाऱ्या लोकांचं स्वागत करतो, परंतु, येथे आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोक देशातील विविध भागातून केरळमध्ये आले आहेत. तर ११,१८९ लोक परदेशातून केरळात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. राज्यात मंगळवारी ६७ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे केरळमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९६३ झाली असून ४१५ जणांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT