RPI President Ramdas Athawale esakal
देश

Ramdas Athawale : काँग्रेस अध्यक्ष कोणाला करायचं? रामदास आठवले स्पष्टचं बोलले

आठवलेंनी नुकतेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी देखील खुली ऑफर दिलीय.

सकाळ डिजिटल टीम

आठवलेंनी नुकतेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी देखील खुली ऑफर दिलीय.

हैदराबाद : काँग्रेसनं नवा अध्यक्ष निवडण्यासंबंधी विस्तृत कार्यक्रमाची रविवारी घोषणा केली. त्यानुसार 24 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर, एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काँग्रेसचे अध्यक्ष होणं युपीएसाठी चांगलं होईल. मात्र, काँग्रेस अध्यक्ष कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. जो कोणी अध्यक्ष होईल आणि आपल्या पक्षाचा विस्तार करेल त्याला आमच्या शुभेच्छा राहतील. वरिष्ठ व्यक्तीला संधी देणं अधिक चांगलं राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी आठवलेंनी नुकतेच काँग्रेस (Congress) सोडलेल्या गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी देखील खुली ऑफर दिलीय. ते म्हणाले, गुलाम नबी आझाद यांनी सत्ताधारी एनडीएसोबत जवळीक साधून काम करावं, अशी ऑफर आठवलेंनी आझादांना दिलीय. गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस सोडल्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळालंय. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस पक्ष गुलाम नबी आझाद यांच्यासोबत जाणार असल्याचं आठवलेंनी सोमवारी स्पष्ट केलं.

गुलाम नबी आझाद यांना आवाहन करून त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्यास सांगितलंय. देश आणि जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी त्यांनी एनडीएसोबत यावं. जर तुम्हाला वेगळा पक्ष काढायचा असेल, तर ती चांगली गोष्ट असून तुम्हाला तसं करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, असंही आठवले म्हणाले. पण, तुमच्या पक्षाला एनडीएसोबतच यावं लागेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT