Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi
Mohan Bhagwat Umar Ahmed Ilyasi esakal
देश

संघ प्रमुख मोहन भागवतांनी मुस्लिम संघटनेच्या इमामाची घेतली भेट; बंद खोलीत दोघांत तासभर चर्चा

सकाळ डिजिटल टीम

इमाम इलियासी आणि मोहन भागवत यांच्यात ही बैठक बंद खोलीत झाली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी आज (गुरुवार) अखिल भारतीय मुस्लिम इमाम संघटनेचे (Indian Imams Association) प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी (Umar Ahmed Ilyasi) यांच्यासह अन्य मुस्लिम नेत्यांची (Muslim Leaders) भेट घेतली. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत ही बैठक झाली.

इमाम इलियासी आणि भागवत यांच्यात ही बैठक बंद खोलीत झाली, ती सुमारे तासभर चालली. भागवत यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमारही उपस्थित होते. यापूर्वी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय गटानं भागवत यांची भेट घेतली होती.

'आरएसएसचे सरसंघचालक सर्व स्तरातील लोकांना भेटतात'

मोहन भागवत यांची एका महिन्यात मुस्लिम विचारवंतांसोबतची ही दुसरी बैठक आहे. सुमारे तासभर चाललेली इमाम उमर अहमद इलियासी यांच्यासोबत युनियन प्रमुखांची बैठक बंद खोलीत झाली. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत सांगितलं की, 'आरएसएसचे सरसंघचालक सर्व स्तरातील लोकांना भेटतात. हा चालू असलेल्या सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. या बैठकीदरम्यान भागवत यांच्यासोबत संघाचे कृष्ण गोपाल, राम लाल आणि इंद्रेश कुमारही उपस्थित होते.'

हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भर

आरएसएसनं अलीकडं मुस्लिमांशी संपर्क वाढवला असून भागवत यांनी समाजातील नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी संघप्रमुख भागवत यांनी मुस्लिम विचारवंतांच्या पाच सदस्यीय चमूची भेट घेतली होती. ही बैठक सुमारे दोन तास चालली. या बैठकीत देशातील जातीय सलोखा मजबूत करणं आणि हिंदू-मुस्लिम (Hindu and Muslim) यांच्यातील वाढतं अंतर कमी करणं यावर भर देण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT