RSS Chief Mohan Bhagwat esakal
देश

RSS Chief : खरे हिंदू होऊन श्रीरामाचा जप केला पाहिजे - मोहन भागवत

'घाबरून न जाता धर्मासाठी काम केलं पाहिजे.'

सकाळ डिजिटल टीम

'घाबरून न जाता धर्मासाठी काम केलं पाहिजे.'

RSS Chief Mohan Bhagwat : प्रभू रामानं समाजातील सर्व घटकांना जोडण्याचं काम केलं. आपण प्रभू रामाच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

बक्सर जिल्ह्यातील (Buxar District) अहिरोली गावात साधूंच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना भागवत यांनी हे वक्तव्य केलंय. सोमवारपासून सुरू झालेल्या नऊ दिवसांच्या कार्यक्रमात भाजपशासित (BJP) राज्यांचे अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. 'श्री राम कर्मभूमी तीर्थ क्षेत्र महाकुंभ' या नऊ दिवसीय धार्मिक संमेलनाचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

बक्सर इथं आयोजित या परिषदेत देशभरातून आलेल्या संत आणि स्वयंसेवकांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, 'घाबरून न जाता धर्मासाठी काम केलं पाहिजे. खरे हिंदू होऊन श्रीरामाचा जप केला पाहिजे. लोकांनी प्रभू रामाच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांनी मांडलेल्या मूल्यांवर आधारित समाजाची स्थापना करण्यावर भर दिला पाहिजे. भगवान रामानं अशा समाजाचा मार्ग मोकळा केला जिथं प्रत्येकजण निर्भयपणे जगत आहे. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समरसतेचा मार्ग अवलंबला आहे. राम मनोहर लोहिया म्हणाले होते की, प्रभू रामानं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाला एकत्र केलं होतं. प्रभू रामानं संपूर्ण देश एकत्र केला हे खरं आहे. आपण सर्व भारतीयांनी प्रभू रामाच्या जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांच्या सामाजिक एकतेच्या कल्पनेला चालना दिली पाहिजे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून एक- दोन नाही तब्बल ४ जणांची एक्झिट; कारण काय?

No Signal in Lift Reason : तुम्ही लिफ्टमध्ये शिरताच तुमचं मोबाईल नेटवर्क का गायब होतं? याचे कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

SCROLL FOR NEXT