RSS vs Uddhav Thackeray
RSS vs Uddhav Thackeray esakal
देश

'धर्मनिरपेक्षतेचा नारा देणारे काश्मिरी पंडितांच्या हत्येवर गप्प का?'

सकाळ डिजिटल टीम

काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर राग येणं साहजिक आहे; पण..

नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येमुळं काश्मिरी पंडित समाजात भीती, चिंतेचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी या प्रकरणानंतर राजकीय पक्षांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. इंद्रेश कुमार यांनी खोऱ्यातील जनतेला दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) साथ देण्याचं आवाहन केलंय.

एएनआयच्या वृत्तानुसार आरएसएस नेते इंद्रेश कुमार पुढं म्हणाले, काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर राग येणं साहजिक आहे. पण, सगळ्यात जास्त राग राहुल गांधी, ममता, केजरीवाल आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांसारख्या धर्मनिरपेक्षतेचा नारा देणाऱ्या पक्षांच्या मौनाचा आहे. कदाचित काश्मिरी पंडित हे या देशाचे रहिवासी नाहीत आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारानं काही फरक पडत नाहीय, असं त्यांना वाटत असावं, अशी टीका त्यांनी केलीय.

इंद्रेश कुमार पुढं म्हणाले, केंद्र सरकारनं (Central Government) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतण्यासाठी मदत करावी. मी खोऱ्यातील स्थानिक लोकांना आवाहन करतो की, त्यांनी पंडितांसह दहशतवादाविरोधात (Terrorist) आवाज उठवावा. जोपर्यंत काश्मीर दहशतवादमुक्त होत नाही, तोपर्यंत देशातील जनता आरामदायी जीवन जगणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान, अतिरेक्यांनी गुरुवारी बडगाम जिल्ह्यात (Jammu and Kashmir) चडुरामध्ये सरकारी कार्यालयात घुसून काश्मीर पंडित राहुल भटची हत्या केली होती. महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत भट यांच्यावर अतिरेक्यांनी खूप जवळून गोळ्या झाडल्या. दुपारी सर्व कर्मचारी काम करत होते, त्यावेळी दोन अतिरेकी घुसले आणि राहुल यांच्या टेबलजवळ जाऊन हल्ला केला. अतिरेक्यांनी यादरम्यान पळ काढला. हल्ल्यात जखमी राहुल यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, यादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT