katchatheevu island
katchatheevu island 
देश

इंदिरा गांधी यांनी भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले? माहिती अधिकारातून उघड

कार्तिक पुजारी

चेन्नई- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये कच्चाथीवू बेट (katchatheevu island) श्रीलंकेला दिलं होतं. हा मुद्दा तमिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापवला जात आहे. तमिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी याप्रकरणी आरटीआय दाखल केली होती. यातून असं समोर आलंय की, भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधूनीमध्ये असलेले १.९ स्क्वेर किलोमीटरचे बेट श्रीलंकेला देण्यात आले होते. (RTI reply shows how Indira Gandhi ceded island to Sri Lanka 1974)

स्वातंत्र्यानंतर कच्चाथीवू बेट भारताच्या ताब्यात होते. पण, श्रीलंकेने म्हणजे तेव्हाच्या सिलोनने या बेटावर दावा सांगितला होता. भारताच्या नौदलाला याठिकाणी युद्धसराव नाकारण्यात आला. शिवाय, १९९५ मध्ये सिलोन हवाईदलाकडून याठिकाणी युद्धाभ्यास करण्यात आला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.(Lok Sabha campaign in Tamil Nadu)

बेट देण्यास मला काहीही संकोच नाही

रिपोर्टनुसार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं याबाबत मत असं होतं की, या छोट्या बेटाचे मला काही महत्त्व दिसत नाही. हा मुद्दा प्रलंबित असणे आणि वारंवार संसदेमध्ये याबाबत चर्चा होत राहणे हे योग्य वाटत नाही. त्यामुळे या बेटावरील दावा मागे घेण्यास मला कसलाच संकोच वाटत नाही.

रिपोर्टनुसार, ज्वालाभूमीच्या उद्रेकाने तयार झालेले कच्चाथीवू बेट १८७५ ते १९४८ पर्यंत निर्विवाद भारताचा भाग होता. हे बेट ब्रिटिश शासनातील मद्रास प्रांतामध्ये येत होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या बेटावर पूर्णपणे भारताचा अधिकार होता, पण १९७४ मध्य हे बेट श्रीलंकेला देण्यात आले. याठिकाणी एक चर्च आहे. शिवाय श्रीलंकेतील मच्छिमार याठिकाणी थांबत असतात.

परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन संयुक्त सचिव के क्रिष्णा राव यांच्या म्हणण्यानुसार, भारताचा या बेटावर दावा सांगण्याचा कायदेशीर अधिकार होता. भारतीय मच्छिमारांसाठी हे बेट महत्त्वाचे ठरले असते. सध्या या भागात मच्छिमारासाठी गेलेल्या अनेक भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेकडून ताब्यात घेण्यात येत आहे.

इंदिरा गांधी यांचा निर्णय

१९६८ नंतर इंदिरा गांधी यांची या मुद्द्यावरुन श्रीलंकेच्या पंतप्रधानांशी चर्चा सुरु झाली होती. या मुद्द्यावरुन भारताच्या संसदेत गदारोळ देखील झाला. विरोधकांनी हे बेट श्रीलंकेला देण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण, इंदिरा गांधी यांनी वाद घालत बसण्यापेक्षा दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं. हाच मुद्दा आता भाजपकडून तापवला जाण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये हा मुद्दा याआधीही गाजला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT