Chandigarh University MMS Case esakal
देश

अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच 7 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न? विद्यापीठाकडून मोठा खुलासा

चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Chandigarh University MMS Case : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University Punjab) विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ लीक झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनंच हे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला जात आहे.

या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानंही (Punjab Commission for Women) घेतली आहे. दरम्यान, चंदीगड विद्यापीठानं याप्रकरणी मोठा खुलासा केलाय. चंदीगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याच्या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. एका मुलीनं शूट केलेला वैयक्तिक व्हिडिओ वगळता कोणत्याही विद्यार्थ्याचे कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत, जे आक्षेपार्ह आहेत जे तिनं तिच्या प्रियकरासह शेअर केले होते, असं चंदीगड विद्यापीठानं म्हटलंय. 7 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची केवळ ही अफवा असून एकाही मुलीनं असं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलंय.

महिला आयोग प्रकरणाची चौकशी करणार : मनीषा गुलाटी

पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी चंदीगड विद्यापीठात पोहोचणार असून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. तर, दुसरीकडं एक विशेष तपास पथकही शिमल्यात पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थिनींनी संयम बाळगावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका : SSP विवेक सोनी

एसएसपी विवेक सोनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हे व्हिडिओ एका विद्यार्थिनीनं शूट केलं होतं आणि नंतर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. अद्याप आत्महत्येच्या प्रयत्नाचं वृत्त आलेलं नाही. त्यामुळं कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT