Navjot Singh Sidhu YUVRAJ singh esakal
देश

Punjab BJP: सिद्धूची सुद्धा होणार घरवापसी? पंजाबमध्ये भाजप खेळणार क्रिकेटपटूंवर डाव

Navjot Singh Sidhu returning to BJP: पंजाबमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्याआधी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात भाजप क्रिकेटपटूंवर डाव लावण्याच्या तयारीत आहे.

कार्तिक पुजारी

अमृतसर- पंजाबमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्याआधी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात भाजप क्रिकेटपटूंवर डाव लावण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय युवराज सिंगला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उभे केले जाण्याची शक्यता आहे. (rumors of Navjot Singh Sidhu returning to BJP Yuvraj Singh from Gurdaspur parliamentary punjab)

नवज्योत सिंग सिद्धू यांचं काँग्रेस पक्षात फारसं मन रमत नसल्याचं दिसून आलय. शिवाय पक्ष नेतृत्त्वावर ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. पक्ष सोडून ते आपल्या वेगळ्या सभा घेत आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. सिद्धू हे आपल्या वक्तृत्वासाठी ओळखले जातात. अनेक टीव्ही कार्यक्रमामधून त्यांनी देशवासीयांवर छाप टाकली आहे.

सिद्धू यांचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पण, पंजाबमधील भाजप नेत्यांना वाटतंय की ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या येण्याचा पक्षाला फायदा होईल. तसेच त्यांना पंजाबमधील एका मतदारसंघातून लोकसभेसाठी तिकीट दिले जाऊ शकते. सोमदेव शर्मा यांनी सांगितलं की, सिद्धू भाजपमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांची चर्चा सुरु आहे. याची माहिती गुप्त ठेवण्यात येत आहे.

अमृतसर या लोकसभा मतदारसंघावर पूर्वीपासून भाजपचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे येथून सिद्धू यांना उभे केले जाऊ शकते. सिद्धू यांच्या अमृतसरमधून जिंकून येण्याच्या शक्यता जास्त आहेत. असे असले तरी काँग्रेस या शक्यतांना फेटाळून लावल्या आहेत. सिद्धू हे भाजपमध्ये जाणार नाहीत. एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारणाऱ्यांची काहीच विश्वासार्हता राहत नाही, असं रमन बक्षी म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप सिद्धू यांना अमृतसरमधून तर युवराज सिंगला गुरुदासपूर येथून उभे करण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. गुरुदासपूरमधून एक सेलिब्रिटी देण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. यापू्वी विनोद खन्ना, सनी देओल यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद खन्ना चारवेळा या मतदारसंघातून खासदार होते. सध्या या मतदारसंघाचे खासदार सनी देओल आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT