russia corona virus.jpg
russia corona virus.jpg 
देश

रशियाची कोरोना लशीसंबंधी भारतातील ३ कंपन्यांशी बोलणी; उत्पादन सुरु करणार?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- रशियाने कोरोना लशी संदर्भात भारताच्या तीन कंपन्यांसोबत संपर्क साधला आहे. रशियाने कोरोनावरील पहिली लस 'स्पुटनिक v'Covid vaccine Sputnik V तयार केली आहे. त्यानंतर या लशीची चाचणी आणि उत्पादन भारतात करण्यासाठी रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडकडून Russian Direct Investment Fund भारताच्या झायडस कॅडिला Zydus Cadilla, वोकार्ड Wockhardt आणि रिलायन्स लाईफसायन्स Reliance Lifesciences या कंपन्यांशी संपर्क केला आहे. 

ऑक्सफर्डच्या लशीची ट्रायल थांबवली, भारतातल्या चाचणीचे काय? सीरमने दिलं उत्तर

भारतानेही रशियाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. लस निर्मिती केलेल्या रशियाच्या गमालिया इन्स्टिट्यूटला यापैकी एका कंपन्यांची किंवा तिन्ही कंपन्यांची सुविधा पुरवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. RDIF ने गमालिया इन्स्टिट्यूटला लस तयार करण्यासाठी मदत केली आहे. स्पुटनिक v लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहिती याआधीच भारतासोबत शेअर करण्यात आली आहे. भारताने यासंबंधिचा अधिकचा डाटा रशियाला मागितला आहे. 

भारतात स्पुटनिक v लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी आणि उत्पादन करण्याची तयारी रशियाने दाखवली आहे. त्यामुळे रशियाने भारताच्या तीन कंपन्यांसोबत बोलणी सुरु केली आहे. भारत सरकारने रशियाला कंपन्यांची सुविधा आणि मंजुरी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. 

निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पोल यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भारताच्या एका चांगल्या मित्राने मदतीचा हात पुढे केला आहे. याला प्रतिसाद म्हणून भारतातील अनेक कंपन्या चीनसोबत भागिदारी करण्यासाठी पुढे आल्या आहेत. तसेत या कंपन्या आणि रशियामध्ये बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. 

श्रीलंकेत होणार गोहत्या बंदी; पंतप्रधान राजपक्षे यांनी केली घोषणा

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये जगातील पहिली कोरोना लस तयार केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर रशियाने कोरोना लशीची पहिली बॅच ८ सप्टेंबर रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली. रशियाने ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पार पाडली आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपातील अनेक तज्ज्ञांनी रशियाच्या या लशीवर संशय व्यक्त केला आहे. तसेच स्पुटनिक v लस भरवशाची नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय, तज्ज्ञांनी लॅसेन्ट नियतकालिकामध्ये रशियन वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

(edited by- kartik pujari)


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT