Air India News Updates
Air India News Updates sakal media
देश

एअर इंडियाचे विमान युक्रेनला रवाना; भारतीयांना परत आणण्याासाठी विशेष मोहिम

सकाळ डिजिटल टीम

भारताने युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे दोन तुकडे केले आहेत. दरम्यान, रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केलीय. भारताने म्हटलं की, युक्रेन आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात राहणाऱ्या २० हजार भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. दुसऱ्या बाजुला अमेरिकेनेसुद्धा रशियाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागलीत असा इशारा दिला आहे. अमेरिकेनं युक्रेनच्या तुकडे केलेल्या भागांमध्ये नव्या गुंतवणुकीवर निर्बंध घातले आहेत.

युक्रेनवर ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी एअर इंडियाचं विशेष विमान युक्रेनमध्ये दाखल झालं आहे. भारताकडून २०० पेक्षा अधिक सीट असलेल्या ड्रीमलायनर बी-७८७ विमानातून भारतीयांना मायदेशी आणलं जाणार आहे.

रशियात घुसल्यास कत्तल..अमेरिकेकडून मोठा खुलासा

रशियाने दोन राष्ट्रांची घोषणा करून राजकीय संघर्ष ओढावून घेतला आहे. यावर जगभरातून नाराजी व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही यासंदर्भात माहिती देण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी शांतता फौज किंवा आमेरिकेने संबंधित राष्ट्रात सैन्य पाठवल्यास रशिया स्थानिक पातळीवर कत्तली करेल, असा दावा अमेरिकेने केला आहे. यासंदर्भात रशियाने हिटलिस्टदेखील तयार केली आहे, असं अमेरिकेने म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On PM Modi Offer: PM मोदींच्या सोबत येण्याच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'PM मोदींमुळे....'

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

Narendra Dabholkar Case Live Updates: अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, सनातन संस्थेचा आरोप

Latest Marathi News Live Update : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; गुरे व कुत्र्यांची करतोय शिकार

SCROLL FOR NEXT