Russia Ukraine War
Russia Ukraine War esakal
देश

Russian Ukraine War | नाशिकची विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकली

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : ''युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धभूमीपासून आम्ही जवळपास ५०० किलोमीटर दूर असून सुरक्षीत आहोत. तेथे धोका फारसा वाटत नसला तरी भीतीतर आहेच. सध्या हॉस्टेलमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. भारतात परतण्यासाठी आम्हाला पॅकिंग करण्यास सांगितल्याने आता आम्ही विमानाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला कोणत्याही क्षणी रोमानिया येथे नेण्यात येणार असून तेथून विमानाने शक्यतो दिल्लीत उतरेल याबाबत मी अपडेट देत राहील काळजी करु नका.'' अशा प्रकारचा संदेश वणीतील गौरी भरत थोरात या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या विद्यार्थीनीने आपल्या काळजीत असलेल्या पालकांना देत धीर दिला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेली गौरी कुटूंबीयांना धीर देतेय

युनिव्हिसिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच दिवसांपूर्वी पोहोचलेली वणी, ता. दिंडोरी येथील गौरी थोरात परतीसाठी विमानाची वाट पाहत आहे. गौरी हिने युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीची पात्रता मिळविली आणि तिचा नंबर लागला. गौरी थोरात ही दुबई येथे नामवंत हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या काकींकडे (चुलती) आजोबा निवृत्त पोलिस अधिकारी पोपटराव थोरात यांच्या समवेत गेलेली होती. तेथूनच गौरी थोरात ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी पाच दिवसांपूर्वी युक्रेनला पोचली होती. दुसऱ्या दिवशी युद्धालासुरुवात झाली आणि गौरी युक्रेनमध्येच अडकली. थोरात कुटुंबीयांना गौरीची काळजी वाटत असताना गौरी मात्र त्यांनाच धीर देत आहे. दर एक- दोन तासात ते तिची विचारपूस करीत आहेत. आज सकाळी गौरीने थोरात कुटुंबीयांना संपर्क करीत मी अजूनही युक्रेनमध्ये सुरक्षित आहे, मी रोमानिया सोडेन तेव्हा अपडेट करेन. मी दिल्लीत उतरेन. आशा आहे की आज येथून निघून जाईन असे सांगुन भारत सरकार व नातेवाईकांचे सहकार्याबद्दल गौरीने आभार व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या प्रवास यादीत गौरीचा नंबर १२ वा

दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांना गौरी थोरात हीची संपूर्ण माहीती देवून भारतात सुरक्षीत आणण्यासाठी विनंती करण्यात आलेली असल्याची माहीती राकेश थोरात, मनोज थोरात यांनी दिली आहे. भारत सरकारतर्फे जारी केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवास यादीत गौरी थोरातचा १२ वा नंबर असून युक्रेनमध्ये अडकलेले सर्वच विद्यार्थी आज भारतात परततील अशी आशा पोपटराव थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT