Russia Ukraine War Update sakal
देश

Russia Ukraine War l काँग्रेसच्या निशाण्यावर केंद्र सरकार; म्हणाले...

काँग्रेसनेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याबाबत निशाणा साधला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली: युक्रेनच्या (Russia Ukraine War) मुद्द्यावरुन काल (ता.३) परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीनंतर काँग्रेस (Congress) खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते. त्याचबरोबर त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तपशीलवार ब्रीफिंग केले आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान आज पुन्हा काँग्रेसनेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. खार्किव आणि सुमीमध्ये (Kharkiv, Sumi) अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यास इतका का वेळ लागत आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद (Shama Mohamed) म्हणाल्या, युक्रेनमधून विद्यार्थ्यांना माघार घेतल्याने सरकारचे क्रूर हृदय समोर आले आहे. युक्रेनच्या सीमेवर पश्चिमी देशाच्या बॉर्डरवर गेलेल्या मंत्र्यांच्या भूमिकेवरही काँग्रेसने शंका घेतली आहे. जे चार ४ मंत्री गेले आहेत ते फक्त गुलाब देण्यासाठी गेले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना कधी परत आणणार

सरकारवर निशाणा साधत काँग्रेसने म्हटले की, स्थलांतर युद्धक्षेत्रात होते, मंत्री शांतता क्षेत्रात आणि विद्यार्थी युद्धक्षेत्रात हे असे कसे असू शकते. म्हणजे मंत्री नेमके गेले कोठे. युक्रेनमध्ये अजूनही किती विद्यार्थी अडकले आहेत आणि किती अधिकारी तेथे तैनात आहेत याचे उत्तर सरकारने द्यावे. तसेच विद्यार्थ्यांना कधीपर्यंत परत आणले जाणार आहे याची माहितीही सरकारने द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी सुमीमध्ये विद्यार्थी किती असहाय्य आणि दु:खी आहेत हे सांगितले आहे.तसेच पंतप्रधान मोदी यांनी सुमीमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT