Ukraine Stamps Sakal
देश

Russia Ukraine War: युक्रेनने काढले Go F*** Yourself लिहिलेले स्टॅम्प्स

पाचच दिवसात ५ लाखांहून अधिक स्टॅम्प विकले गेले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यावेळी रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या स्नेक आयलँडवरच्या सीमाभागातल्या सैन्याला हे बेट आपल्या ताब्यात देण्यास सांगितलं होतं. मात्र त्यावेळी युक्रेनियन सैन्याने माघार न घेता खंबीरपणे लढत दिली. याशिवाय रशियाच्या सैनिकांना युक्रेनच्या सैन्याने "Go F*** Yourself" असं म्हटल्याचीही चर्चा होती.

मात्र जेव्हा ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावेळी युक्रेननं आता याचे स्टॅम्प तयार केले आहेत. या स्टॅम्पवर एक सैनिक समुद्रातल्या जहाजाकडे पाहून मधलं बोट दाखवताना दिसत आहे.तसंच या स्टॅम्पवर Go F*** Yourself असं लिहिलेलंही आहे. युक्रेनच्या नागरिकांनी हे स्टॅम्प खरेदी करण्यासाठी आता पोस्ट ऑफिसांबाहेर रांगा लावल्या आहेत. हा आमच्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे आमच्या धैर्याचं आणि खंबीरपणाचं प्रतीक आहे.

युक्रपोश्ता या पोस्टल नियंत्रकांच्या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे. हे स्टॅम्प प्रकाशित होऊन आता पाच दिवस झालेत आणि या पाच दिवसांमध्ये तब्बल ५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. एका स्पर्धेमार्फत या स्टॅम्पसाठी डिझाईन्स मागवण्यात आली होती. त्यातून एक डिझाईन निवडण्यात आलं आहे. हे स्टॅम्प्स विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले असून काही प्रमाणात ऑनलाईनही खरेदी करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का! एकाच दिवशी तीन नेत्यांनी सोडली साथ; शिंदे शिवसेनेत एन्ट्री

Dink Ladoo: हिवाळ्यात डिंक लाडू आरोग्यासाठी का आहे उपयुक्त? जाणून घ्या

Keshika Purkar : नाशिकच्या टेबल टेनिस स्टारची ऐतिहासिक कामगिरी; केशिका पूरकरने पटकावला 'तिहेरी मुकुट'!

Kolhapur News: हुपरीतील ‘चंदेरी नगरी’चा तेज हरपला; पाणीपुरवठा, अतिक्रमणे आणि निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त!

ज्या पद्धतीने मला रिजेक्ट केलं गेलं... 'अनन्या'मध्ये रिप्लेस झाल्याबद्दल ऋतुजा स्पष्टच म्हणाली, 'रवी जाधव यांना...'

SCROLL FOR NEXT