Mahmood Asad Madani
Mahmood Asad Madani esakal
देश

समान नागरी कायदा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही; 'जमियत'मध्ये ठराव

सकाळ डिजिटल टीम

'देशात द्वेषाचा धंदा करणाऱ्यांची दुकानं फार काळ टिकत नाहीत.'

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूरच्या देवबंदमध्ये जमियत-उलेमा-ए-हिंदच्या (Jamiat Ulema-e-Hind) बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यात समान नागरी कायद्याबाबत आणलेल्या प्रस्तावाचाही समावेश आहे. जमियतनं स्पष्टपणे सांगितलं की, समान नागरी संहिता (Common Civil Code) कोणत्याही किमतीत स्वीकारली जाणार नाही. याची अंमलबजावणी करणं हे संविधानाचं उल्लंघन ठरेल. इस्लामिक कायदा आणि सुव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप मान्य होणार नाही. जमियत संमेलनात ज्ञानवापी मशीद आणि मथुरा इदगाह मशिदीबाबतही ठराव मंजूर करण्यात आलाय.

देशाच्या अनेक भागात मशीद-मंदिरच्या वादाला हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, कर्नाटकात हिजाबनंतर (Karnataka Hijab Controversy) मशीद-मंदिर वाद पुढं आला आहे. त्यातच आता तेलंगणात ही शिवलींगवरून राज्यातील सर्व मशिदी खोदू अशी वादग्रस्त विधान होत आहे. त्याचदरम्यान जमियत उलेमा-ए-हिंद यांनी उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये दोन दिवसीय सम्मेलन आयोजित केलंय. ज्यात विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आज या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, इस्लामोफोबियावर (Islamophobia) चर्चा झाली. तसेच इथं मुस्लिम धार्मिक नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद असद मदनी (Mahmood Asad Madani) म्हणाले, देशात नकारात्मक राजकारणाची संधी साधली जात आहे. मंदिर-मशीद वादामुळं देशातील शांतता बिघडणार आहे. सर्वांना सोबत घेऊनच राष्ट्र उभारणी होईल. मुस्लिम या देशासाठी प्राण द्यायला तयार आहेत. आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याची भाषा करत आहेत. मात्र, ज्यानं कोणाला मुस्लिमांविषयी व्देष वाटतो, त्यांनीच पाकिस्तानात जावं. हा आमचा देश आहे, आम्ही कुठंही जाणार नाही आहोत. आमचा धर्म वेगळा असला तरी देश एकच आहे, असंही मदनी यांनी सांगितलं. दरम्यान, समान नागरी संहिता स्वीकारण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय.

आरएसएस-भाजपवर हल्लाबोल

मदनी यांनी नाव न घेता आरएसएस आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, देशात द्वेषाचा धंदा करणाऱ्यांची दुकानं फार काळ टिकत नाहीत. देशाला जोडणारे आणि मजबूत करणारेच या देशाची खरी ताकद आहेत. आम्ही या देशाला आबादी करणार आहोत, जमियत उलेमा हिंद ही देशातील सर्वात जुनी संघटना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT