Sam Pitroda rahul gandhi 
देश

Sam Pitroda: 50 दिवसांपूर्वी राजीनामा अन् आज फेरनियुक्ती; काँग्रेससाठी सॅम पित्रोदा का महत्त्वाचे आहेत?

Sam Pitroda re-appointed By Congress: भविष्यामध्ये पित्रोदा कोणताही वाद निर्माण करणार नाहीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तर, भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सततच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी 50 दिवसांतच फेरनियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यामध्ये पित्रोदा कोणताही वाद निर्माण करणार नाहीत, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तर, भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. निवडणुकीमध्ये हे फक्त दाखवण्यापुरतं होतं, असं भाजप म्हणाले आहे.

गांधी घराण्याचे विश्वासू असलेल्या पित्रोदा यांनी भारतातील ईशान्येकडील नागरिक चिनी नागरिकांसारखे दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी भारतातील विविध राज्यांतील नागरिकांच्या दिसण्यावरून अशीच आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेसनेही त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगत हात झटकले होते. हा वाद शमल्यानंतर आता पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज कांग्रेसच्या फेरनिवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करत होते. त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला होता, असं सॅम पित्रोदा 'इंडिया टूडे'शी बोलताना म्हणाले आहेत.

सॅम पित्रोदा कोण आहेत?

राजीनामा दिल्यानंतर ५० दिवसातच सॅम पित्रोदांची फेरनियुक्ती करण्यात आलीये. सॅम हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आहेत. सत्यनारायण गंगाराम पित्रोदा म्हणजेच सॅम पित्रोदा यांना भारतातील टेलिकम्युनिकेशन क्रांतीचे जनक म्हटलं जातं. सरकारसोबत मिळून त्यांनी याबाबत मोठं काम केलं आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सॅम यांनी कधीच गांधी कुटुंबाला एकटे सोडलं नाही.

सॅम यांचा जन्म ओडिशाच्या टितलगड येथे गुजराती कुटुंबात झाला. सॅम यांनी त्यांची व्यावसायिक कारकीर्द १९६० मध्ये अमेरिकेतून केली. भारतात काम करण्याच्या उद्देशाने त्यांचा संपर्क गांधी कुटुंबाशी आला. राजीव गांधी यांच्यासोबत काम करत असताना त्यांची गांधी कुटुंबाशी जवळीक निर्माण झाली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार म्हणून सॅम पित्रोदा यांनी काम केलं आहे. त्यांची फेरनियुक्ती होण्यामागे त्यांचे गांधी घराण्याची असलेले जवळचे संबंध हे कारण मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT