Azam Khan Esakal
देश

Azam Khan: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल

सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

सर गंगाराम रुग्णालयाच्या उपाध्यक्ष डॉ. बीबी अग्रवाल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आझम खान यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, "आझम खान यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे."

आझम खान सध्या उत्तर प्रदेशमधील सीतापूर तुरुंगात आहेत. आझम खान यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आपल्या वक्तव्यांमुळे खासदार आझम खान कायम चर्चेत आले होते. लोकसभा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

आझम खान रामपूर मतदारसंघातून 10 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही आझम खान रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तुरुंगातून त्यांनी ती निवडणूक लढवली होती, पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना आपले विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT