samajwadi party mla petrol pump bulldozed after threats to up cm yogi adityanath  
देश

योगींविषयी अक्षेपार्ह विधान; सपा आमदाराच्या पेट्रोल पंपावर चालला बुलडोझर

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील बरेली येथील जिल्हा अधिकार्‍यांनी गुरुवारी आमदार शाझील इस्लाम अन्सारी यांच्या मालकीचा पेट्रोल पंप त्यांनी आवश्यक परवानग्यांशिवाय बांधल्याचा दावा केल्यानंतर तो पाडण्यात आला आहे. अन्सारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. दिल्ली-रामपूर महामार्गावर पेट्रोल पंप होता, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

याआधी सोमवारी आमदार शाझील इस्लाम अन्सारी यांचा आदित्यनाथ यांना धमकावताना आणि प्रक्षोभक वक्तव्य करतानाची व्हिडिओ क्लिप ऑनलाइन समोर आल्यानंतर ते वादात सापडले होते. बरेलीमध्ये पक्षाच्या समर्थकांना संबोधित करताना, शाझील इस्लाम अन्सारी यांनी, "जर त्यांच्या (आदित्यनाथ) तोंडातून आवाज निघाला तर आमच्या (समाजवादी पक्षाच्या) बंदुकांमधून धूर नाही तर गोळ्या निघतील," असे विधान केले होते.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात 'प्रक्षोभक विधाने' केल्याच्या आरोपावरून अन्सारी आणि इतर काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दंगल भडकवण्याच्या उद्देशाने शांतता बिघडवणारी, धमकी देणारी आणि चिथावणीखोर विधाने केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आमदाराने मात्र व्हिडीओ क्लिपच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचा दावा केला आहे. "एका वृत्तवाहिनीने माझा व्हिडिओ संपादित केला आणि नंतर तो व्हायरल केला. कार्यक्रमात मी म्हटले होते की, प्रबळ विरोधी पक्ष असल्याने आम्ही धूर नाही तर गोळ्या सोडणाऱ्या बंदुकीसारखे सर्व गोष्टींना जोरदार प्रत्युत्तर देऊ," असे असे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे PTI ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT