tata ambani
tata ambani google
देश

Ratan Tata Birthday : ...म्हणून रतन टाटा आणि धीरुभाई अंबानी आहेत एकसारखे

नमिता धुरी

मुंबई : आज २८ डिसेंबर हा भारतातील दोन मोठ्या उद्योगपतींचा वाढदिवस आहे. रतन टाटा ८५ वर्षांचे झाले आहेत, तर रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा ९० वा वाढदिवस आहे.

धीरूभाईंनी कपड्यांच्या व्यवसायातून एक कंपनी उभारली जिचा प्रवास ऊर्जा, रिटेल ते मीडिया-मनोरंजन आणि डिजिटल सेवांपर्यंत पसरला आहे. ही कंपनी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या घड्याळापर्यंत आपल्या जीवनाचा एक भाग आहे.

१९५० च्या दशकात टाटा साम्राज्यातून सरकारकडे गेलेल्या एअर इंडिया एअरलाइन्सला रतन टाटा यांनी पुन्हा आपल्या साम्राज्यात आणले आहे. परदेशी कंपनी फोर्डच्या लँड रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचा समावेश टाटांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये केला आहे.

तसेच जगातील सर्वात मोठी चहा उत्पादक कंपनी टेटली या कंपनीचे अधिग्रहण केले. युरोपियन पोलाद उत्पादक कोरस हा ब्रॅण्ड विकत घेतला. या दोघांचा फक्त वाढदिवस एक नाही तर इतर अनेक गोष्टी सारख्याच आहेत. हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

धाडसी निर्णय

१९५० साली धीरुभाई अंबानी यांनी येमेनमध्ये एका पेट्रोल पंपावर ३०० रुपये प्रतिमहिना वेतनावर नोकरी सुरू केली. २ वर्षांत ते मॅनेजर बनले. पण त्यानंतर भारतात येऊन स्वत:चे काम सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. सूत म्हणजेच कॉटनचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. १९६६ साली हा उद्योग रिलायन्स टेक्स्टाइल नावाने ओळखला जाऊ लागला.

रतन टाटा यांनी असेच काही धाडसी निर्णय घेतले. जग्वार आणि लॅण्ड रोव्हर या लग्झरी ब्रॅण्डमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. युरोपातील दुसऱ्या क्रमांकाची पोलाद उत्पादक कंपनी कोरसचे अधिग्रहण केले. टाटा कंपनीच्या तुलनेत तिप्पट मोठी कंपनी असलेल्या टेटले या चहाच्या ब्रॅण्डचेही अधिग्रहण टाटांनी केले.

स्वतंत्र भारतातील पहिला आयपीओ १९७७ साली अंबानींनी आणला. १० रुपयांच्या किंमतीचे २ कोटी ८० लाख शेअर्स त्यांनी सादर केले होते. हा आयपीओ ७ पट ओव्हर सबस्क्राइब झाला होता. गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला.

१९९० साली टाटांनी पेसेंजर कार तयार करण्याचा निर्णय घेतला. आज ते देशातील मोठ्या कार उत्पादकांपैकी एक आहेत.

वस्त्रोद्योगानंतर टाटांनी टेलिकम्युनिकेशन, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, विद्युत पुरवठा, किरकोळ बाजार, भांडवली बाजार, बांधकाम व्यवसाय, लॉजिस्टिक्स, इत्यादी व्यवसायांमध्येही उडी घेतली.

नवकल्पना

१९७९ सर्वप्रथम अंबानींनीच सरकारला कनव्हर्टिबल डिबेंचरसाठी राजी केले. २००२ साली अंबानींनी 'कर लो दुनिया मुठ्ठी में' अशी घोषवाक्यासह टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात प्रवेश केला. फक्त ६०० रुपयांत मोबाईल आणि १५ पैसे प्रतिमिनिट कॉल उपलब्ध करून दिला.

१ लाखात कार लॉन्च करण्याची नवी कल्पना रतन टाटा यांनी प्रत्यक्षात आणली. तसेच १९९८ साली लॉन्च करण्यात आलेली टाटा इंडिका ही देशातील पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची कार होती.

पॉलिस्टर तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाची आयात करण्याचे नियम कठोर होते. त्यामुळे अंबानींनी पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन स्थानिक पातळीवर सुरू केले. ओला, लेन्सकार्ट, पेटीएमसारख्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटांनी त्यात गुंतवणूक केली.

नेतृत्वक्षमता

अंबानी हे चांगले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कंपनीतला सर्वात सामान्य कर्मचारीही त्यांच्याजवळ आपली व्यथा मांडू शकत होता. रतन टाटा यांची ध्येयधोरणे स्पष्ट असतात आणि त्या दिशेने काम करण्यासाठी ते आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करतात.

अंबानींच्या नेतृत्वगुणांवर गुंतवणूकदारांचा एवढा विश्वास होता की रिलायन्सचे शेअर्स मिनिटभरात विकले गेले होते. त्यांना आपली वार्षिक सर्वसाधारण सभा स्टेडियममध्ये करावी लागत असे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाईट काळात टाटांची साथ कायम मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT