Harish Iyer 
देश

Same Sex Marriage: "आता आमदार-खासदारांनी आमच्यासाठी लढायचं"; याचिकाकर्त्यांनी सांगितला पुढचा प्लॅन

सुप्रीम कोर्टानं समलींगी विवाहाला मान्यता नाकारली पण LGBTQ समाजाच्या विविध बाबींच्या पूर्ततेचे निर्देश दिलेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Same Sex Marriage: सुप्रीम कोर्टानं समलींगी विवाहाला मान्यता नाकारली पण LGBTQ समाजाच्या मुलभूत अधिकाऱ्यांच्या विविध बाबींच्या पूर्ततेचे निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर एक याचिकाकर्ते हरिश अय्यर यांनी आता पुढील प्लॅन काय असेल हे स्पष्ट केलं आहे. (Same Sex Marriage Now MP and MLA should fight for us next plan was told by petitioner Harish Iyer)

जबाबदारी केंद्र सरकारवर

अय्यर म्हणाले, "सुप्रीम कोर्टानं भलेही निर्णय आमच्या बाजूनं दिलेला नसला तरी अनेक गोष्टींचं लॉजिक त्यांनी आमच्याबाजून लावलं आहे, तसे निर्देश आणि टिप्पण्या कोर्टानं केल्या आहेत. तसेच समलैंगिक विवाहांच्या कायद्याबाबतची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, त्यांना निर्देश दिलेत की याबाबत सरकारनं काहीतरी करावं" (Latest Marathi News)

आता आमदार-खासदारांकडं जावं

पण सुप्रीम कोर्टातच केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी आमच्याविरोधात बरंच काही मांडलं होतं. पण आता हे महत्वाचं आहे की आम्ही सरकारकडं गेलं पाहिजे. तसेच LGBTQ शी संबंधित लोकांनी आपण निवडून दिलेल्या आमदार-खासदारांकडं जावं. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना सांगावं की आपण तितकेच वेगळे आहोत जितके दोन व्यक्ती असतात. (Marathi Tajya Batmya)

पुढील प्लॅन काय?

पुढील प्लॅन असा आहे की, ही लढाई पुढे सुरुच राहिल. समतेकडं जाणारा आमचा जो प्रवास आहे, तो सुरु आहे. याला आणखी काही काळ जाईल, पण आम्ही सामाजिक समता मिळवूनच दाखवू, असंही LGBTQ कार्यकर्ते हरिष अय्यर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT