sampriti yadav 
देश

50 वेळा मुलाखतीत नापास होऊनही हार नाही मानली, गुगलने दिला 1 कोटी पगार

सकाळ डिजिटल टीम

प्रयत्न करणारे कधीही हार मानत नाहीत. यशाच्या शिखरावर जायचं असेल तर मेहनत सोडू नका! तुमची स्वप्ने कधीतरी नक्कीच पूर्ण होतील. बिहारमधील संप्रीती यादव या २४ वर्षांच्या तरुणीने परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर कामगिरी केल्याचं समोर आलंय. एक वेळ अशी होती, ज्यावेळी संप्रिती यादवला सलग 50 मुलाखतींमध्ये नकार मिळाला. तिच्याकडे नोकरी नव्हती. (Sampriti in Google)

मात्र, एवढ्या अपयशानंतरही संप्रीतीने हार मानली नाही. आज त्यांना चार कंपन्यांच्या ऑफर आहेत. एवढेच नाही तर गुगलने त्याला 1.10 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजही ऑफर केलं आहे. संप्रीतीने अखेर तिने गुगलची ऑफर स्वीकारलीय. संप्रीती यादव १४ फेब्रुवारीपासून गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहेत.

त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. गुगलमध्येही नोकरी मिळवणं देखील संप्रीतीसाठी सोपं नव्हतं. त्यांनी परीक्षेच्या 9 फेऱ्या पार केल्या आहेत. गुगलने संप्रितीच्या मुलाखतीच्या 9 फेऱ्या घेतल्या.

मायक्रोसॉफ्टकडूनही ऑफर

संप्रीतीला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोकरीची ऑफरही आली होती. गुगलच्या मुलाखतीसाठी तिने खूप मेहनत घेतल्याचे संप्रितीने सांगितलं. प्रत्येक फेरीत त्याच्या उत्तराने अधिकारी समाधानी होते. तुम्हाला काही मोठं करायचं असेल, तर सर्वप्रथम ध्येय निश्चित करा, असं संप्रीतीने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT