samsung 
देश

सॅमसंगच्या निर्णयाने चीनला दणका; भारतात करणार 4825 कोटींची गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत चीन यांच्यात सीमेवरील तणावानंतर भारताकडून चायनिज वस्तूंवर बंदीची मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने देशाच्या सुरक्षेचा हवाला देत चीनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदीची कारवाई केली होती. कोरोना चीनने पसरवल्याचा आरोप जगभरातून होत आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी चीनमध्ये गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतं. यातच आता सॅमसंगची भर पडली आहे. दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग भारतात ओएलईडी मोबाईल आणि आयटी डिस्प्ले युनिट सुरू करणार आहे. 

सॅमसंगचा हा प्रोजेक्ट 4825 कोटींचा असून भारतात त्याची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा प्रोजेक्ट चीनमध्ये होणार अशी चर्चा होती. मात्र सॅमसंगने आता भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानं चीनला दणका बसला आहे. 

दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडात मोबाईल आणि आयटी डिस्प्ले युनिट प्रोजेक्ट सॅमसंग सुरू करणार आहे. यासाठी भारताच्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटस अँड सेमिकंडक्टर्स अंतर्गत 460 कोटींची आर्थिक मदत केली जाणार आहे. 

ओएलईडी पद्धतीने मोबाईल डिस्प्ले तयार करणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसरा देश असणार आहे. याआधी दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममध्ये हा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशातील नोएडात प्रोजेक्ट सुरू होणार आहे. सॅमसंगने चीनमधील युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतात हा प्रोजेक्ट यावा यासाठी प्रयत्न केले जात होते. या प्रयत्नांना यश आले असून चीनला मोठा फटका बसला आहे. 

उत्तर प्रदेशात सुरु होणाऱ्या या प्रोजेक्टमुळे दीड हजारांहून अधिक लोकांना थेट रोजगार मिळेल. तसंच अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल असं उत्तर प्रदेशातील गूंतवणूक मंत्री सिद्धार्थनाथ यांनी म्हटलं आहे. या प्रोजेक्टमुळे उत्तर प्रदेशला वेगळी ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याआधीच मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना अनेक बाबतीत सूट दिली आहे. सॅमसंगला मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार असल्याचंही उत्तर प्रदेश सरकारने म्हटंल आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT