Sandeshkhali Violence Fact Finding Team arrested in west bengal high court former chief justices agitation  
देश

Sandeshkhali Violence : फॅक्ट फाइंडिंग टीमला बंगाल पोलिसांनी रोखलं; हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांचे रस्त्यावर धरणे

Sandeshkhali Fact Finding Team : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झालेल्या संदेशखाली पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या फॅक्ट फाइंडिंग टीमला पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे

रोहित कणसे

Sandeshkhali Fact Finding Team : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झालेल्या संदेशखाली पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या फॅक्ट फाइंडिंग टीमला पोलिसांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे या सहा सदस्यांच्या टीमचे नेतृत्वा हे पाटणा हायकोर्टाचे माजी चीफ जस्टिस एल नरसिम्हा रेड्डी हे करत आहेत.

पोलिसांनी संदेशखाली मध्ये कलम १४४ लागू केल्याचे कारण सांगत फॅक्ट फाइंडिंग टीमला संदेशखाली पासून ५२ किलोमिटर दूर भोजेरहाट परिसरात रोखले आहे.त्यानंतर या टीमकडून रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. ट्रॅफिक जाम आणि गोंधळानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतला असून कोलकाता येथील लाल बाजार येथील पोलीस मुख्यालयात घेऊन जात त्यांना सोडून दिलं.

फॅक्ट फाइंडिंग टीममध्ये आहेत 'हे' लोक

माजी न्यायमूर्ती एल नरसिम्हा रेड्डी व्यतिरिक्त, फॅक्ट फाइंडिंग टीममध्ये माजी आयपीएस राजपाल सिंह, माजी राष्ट्रीय महिला आयोग सदस्य चारू वली खन्ना, वकील ओपी व्यास आणि भावना बजाज यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार संजीव नायक यांचा समावेश आहे.

मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग टीम संदेखाली येथे पोहोचली होती. पोलिसांनी त्यांना रोखले असता, टीममधील सदस्य चारू वली खन्ना यांनी सांगितले की, आम्ही संदेशखाली येथे जात होतो, मात्र आम्हाला रोखण्यात आले. पोलिसांनी जाणूनबुजून आम्हाला अडवले असून, अडचणी निर्माण केल्या जात आहेत. पोलीस आम्हाला पीडितांना भेटू देत नाहीत. आम्हाला का ताब्यात घेत आहे, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे? महिलांवर ज्या प्रकारची प्रताडना केली जाते, त्या प्रकरणात पोलिसांनी काय केले असा प्रश्न पडतो. पोलिसांनी आम्हाला रोखण्याचे कोणतेही कारण नाही, त्यांना तसे करण्यास सांगितले जात आहे.

ताब्यात घेण्यापूर्वी टीमचे आणखी एक सदस्य ओपी व्यास म्हणाले की, आम्ही येथे शांततेने बसून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत आहोत, कारण आम्हाला बेकायदेशीरपणे थांबवण्यात आले आहे. हे आमच्या हक्कांच्या विरोधात आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार करणार आहोत.

रामनवमीच्या वेळीही आम्हाला अशाच प्रकारे थांबवण्यात आले कारण ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला काय दाखवायचे आहे ते समजत नाही. राज्यातील घटनात्मक संरचना नष्ट केली जात आहे. दुर्दैवाने पोलिसही बेकायदेशीर आदेशांचे पालन करून कायदा हातात घेत आहेत. आम्हाला संदेशखालीतील पीडितांना भेटायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT