देश

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली! विद्यमान खासदाराला डावलून आमदाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

संतोष कानडे

Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागची डोकेदुखी कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता बुलडाणा लोकसभेसाठी आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आणि विद्यमान खासदारांना नाकारुन गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी अजून जाहीर झालेली नाही. त्यापूर्वीच विजय शिवतारे, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्या कुरबुरी सुरु आहेत. यातच आता बुलडाण्याच्या संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना हा स्वपक्षातून झटका समजला जातोय.

उमेदवारांची नावं जाहीर झालेली नसताना संजय गायकवाड यांनी अर्ज का दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होतोय. गायकवाड यांनी दोन अर्ज भरल्याची माहिती येतेय. एक अपक्ष आणि दुसरा पक्षाकडून. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

संजय गायकवाड यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतता, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने शिंदेंसमोरची डोकेदुखी वाढणार आहे. बुलडाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षातूनच हा मोठा धक्का समजला जातोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र

INDW vs BANW 5th T20I : भारतीय महिला संघाकडून बांगलादेशला व्हाईट वॉश; पाचव्या सामन्यातही दिली मात

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT