Sanjay Raut  
देश

Sanjay Raut : ...तर पाकिस्तान ताब्यात घ्यायला आम्हाला जावं लागेल ; राऊतांचे काश्मीरमधून आव्हान!

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आज (गुरुवार) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत संजय राऊतही सहभागी होणार आहेत. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. (Sanjay Raut has gone on a tour of Jammu and Kashmir)

२०१४ मध्ये सर्वात मोठा मुद्दा काश्मीरचा होता. या मुद्द्यावर लोकांनी मतदान केले. पाकव्याप्त कश्मीर भारतात आणू, असा प्रचार मोदींनी केला होता. मोदींनी ते नंतर बघावं पण आधी कश्मीरी पंडितांचा जीव वाचवावा. ही छोटी गोष्ट मोदी सरकार करु शकत नाही आणि पाकव्याप्त कश्मीरच्या गोष्टी करता. बाळासाहेब ठाकरे पहिले नेते होते ज्यांनी कश्मीरी पंडितांचा मुद्दा उचलला, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी सरळ पाकीस्तानला जावे, असा टोला शिंदे गटाच्या नेत्यांनी लगावला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. पाकीस्तानमध्ये तुम्ही जायला पाहिजे होते. तुम्ही अखंड भारत आणि पाकव्याप्त काश्मीर बाबात घोषणा केल्या होत्या. तुम्हाला हे जमत नसेल तर आम्ही जाऊन घेऊन येऊ. आमचे सरकार आले तर आम्ही करु. पाकिस्तान ताब्यात घ्यायला आम्हाला जावं लागेल, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

भाजप नेहमी कश्मीरी पंडीतांच्या मुद्द्यावर राजकारण करते. मात्र हा राजकारणाचा विषय नाही. नरेंद्र मोदी यांनी आधी कश्मीरी नागरीकांच्या समस्या सोडवाव्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT