Sanjay Raut 
देश

"चाटुकारिता पुरस्कार असता तर संजय राऊत...."; भाजपचं टीकास्त्र

"चाटुकारिता पुरस्कार असता तर संजय राऊत...."; भाजपची सडकून टीका वाचा, नक्की आहे तरी काय हे नवीन प्रकरण Sanjay Raut Editorial slamming Pm Modi Decision of Khel Ratna will Get Flattery Award taunts BJP vjb 91

विराज भागवत

वाचा, नक्की आहे तरी काय हे नवीन प्रकरण

मुंबई: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाच्या यशानंतर केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले. यामुळे नावबदलामुळे राजकारण तापले. काँग्रेसने नामांतराला विरोध करण्याची भूमिका न घेता निर्णयाचे स्वागतच केले. पण त्याचसोबत ज्या स्टेडियमला नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांची नावे आहेत ती पण बदलून खेळाडूंची नावे देण्याची मागणी करण्यात आली. या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये अग्रलेख लिहीला. त्या अग्रलेखावरून भाजपने राऊतांवर जहरी टीका केली.

"लोकभावनेचा आदर ठेवत राजीव गांधी खेळ पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळ पुरस्कार ठेवण्यात आले आहे. सामनामध्ये आज संजय राऊत अग्रलेखात लिहतात की केंद्र सरकारने राजनैतिक खेळी खेळली आहे. जेणेकरुन अनेकांची मने दुःखी झाली आहेत. एकेकाळी सामना मुखपत्र हे शिवसेनेचे मुखपत्र असायचे. पण संजय राऊतांच्या या चाटुकरिताच्या अग्रलेखामुळे ते 'सोनियासेने'चं मुखपत्र झालं आहे, यात काहीच शंका नाही. जर चाटुकारिताला सर्वश्रेष्ठ पुरस्कार असेल तर संजय राऊत यांच्या आजच्या अग्रलेखाला तो सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळेल याची मला खात्री आहे", अशी बोचरी टीका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी केली.

PM Modi

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी संघाची प्रेरणादायी कामगिरी झाली. तसेच पुरुषांच्या हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांचा दुष्काळ संपवत ब्राँझपदक मिळवले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा केली. जनभावनेचा आदर म्हणून या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटद्वारे जाहीर केले. त्यानंतर विविध स्तरातून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT