parliment sakal
देश

Sansad Ratna Awards 2023: संसदरत्न पुरस्कारांसाठी १३ खासदारांना नामांकन; महाराष्ट्रातून 'यांचा' समावेश

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांपैकी कोणत्या खासदारांचा यात समावेश? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संसदरत्न पुरस्कार २०२३ साठी देशभरातील १३ खासदारांना नामांकन जाहीर झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. आठ लोकसभा आणि पाच राज्यसभेच्या खासदारांचा यामध्ये समावेश आहे. (Sansad Ratna Awards 2023 13 MPs nominated Including four from Maharashtra)

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीनं या खासदारांना नामांकित केलं आहे. ज्या खासदारांना नामांकित करण्यात आलं आहे, त्यामध्ये १७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून हिवाळी अधिवेशन २०२२च्या शेवटापर्यंत संसदेत विचारण्यात आलेले प्रश्न, खासगी विधेयकं आणि त्यावरील डिबेटमधील प्रभावशाली सहभागावर आधारित असतं.

लोकसभेतील 'या' खासदारांना नामांकन

भाजप - बिद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मुजुमदार

काँग्रेस - अधीर रंजन चौधरी, कुलदीपराय शर्मा, विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता

राष्ट्रवादी काँग्रेस - डॉ. अमोल कोल्हे

राज्यसभेतील 'या' खासदारांचा सन्मान

सीपीएम - जॉन ब्रिट्स

राजद - मनोज झा

राष्ट्रवादी - फौजिया खान

सपा - विश्वंभर निषाद

काँग्रेस - छाया वर्मा

त्याचबरोबर लोकसभेच्या वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा आणि परिवहन, पर्यटन आणि सांस्कृतीक समितीचे अध्यक्ष विजयसाई रेड्डी यांच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे.

अब्दुल कलाम यांच्या सुचनेनुसार झाली सुरुवात

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. आजवर ९० खासदारांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT