sansad Sakal
देश

अनुचित टिपणीवरून सभापती संतप्त; मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन

बिर्ला यांनी आज शून्य काळादरम्यान महुआ मोईत्रा यांचा उल्लेख न करता त्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभेत पीठासीन अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याच्या आणि सोशल मीडियावर आसनाबद्दल अनुचित टिपणी करण्याच्या प्रकारावरून संतप्त झालेले सभापती ओम बिर्ला यांनी आज सर्व खासदारांना शिस्तीच्या आणि सभागृहातील मर्यादांचे पालन करण्यासाठी खडे बोल सुनावले.

राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पीठासीन अधिकारी असलेल्या तालिका सभापती रमा देवी यांच्याशी हुज्जत घातली होती. तसेच त्यांनी आपल्या भाषणाचा वेळ घेतला असल्याचा ट्विटरवर आरोप करताना पीठासीन अधिकारी आपल्याला केवळ नियमाबद्दल सांगू शकतात, ते आपले नैतिकतेचे शिक्षक नाहीत, अशी टिप्पणी केली होती. सोबतच सभापती ओम बिर्ला यांनाही लक्ष्य करताना, भाषणासाठी १३ मिनिटांचा वेळ देण्याबद्दलही खासदार महुआ मोईत्रा यांनी सवाल उपस्थित केला.

बिर्ला यांनी आज शून्य काळादरम्यान महुआ मोईत्रा यांचा उल्लेख न करता त्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सदनात आणि बाहेर सभापती स्थानाबद्दल टिकाटिप्पणी केली जाणे अनुचित आहे. सदनाची मर्यादा उच्च कोटीची असून आसनाचा प्रयत्न सदनात निष्पक्षपाती कामकाज करण्याचा असतो. अध्यक्षांच्या स्थानावर बसणाऱ्या सदस्यांना अध्यक्षांइतकेच सर्वाधिकार प्राप्त असल्याने त्यांच्यावर सभागृहात किंवा बाहेर, विशेषतः सोशल मीडियावर टिप्पणी करणे अनुचित आहे. सभागृहात मर्यादेचे पालन होईल तेवढे चांगले, अशा शब्दांत अध्यक्षांनी फटकारल्यानंतर गटनेत्यांनी झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करताना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सर्वजण पीठासीन अधिकाऱ्यांचा आदर करतात, अशी ग्वाही दिली. तर तृणमूलचे गटनेते सुदीप बंदोपाध्याय यांनीही सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालचा प्रकार वेदनादायी असल्याचे मत मांडले. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आसनाचा आदर करण्याची परंपरा आहे, अशी टिप्पणी केली. दरम्यान, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीही कालचा घटनाक्रम दुर्दैवी असल्याचे म्हणत लोकशाहीच्या मर्यादा पालनाचे आणि आसनाचा आदर राखण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT