Nitesh Rane News Sakal
देश

नितेश राणेंची आता अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश यांच्या डोक्यावर अटेकची तलावर कायम आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली (Kankavali) येथील शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी आता २७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टानं त्यांचा जामीन फेटाळला होता. (Santosh Parab attack case Nitesh Rane runs to Supreme Court for prearrest bail)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सुरुवातीला नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतली पण दोन्हीकडे नितेश राणे यांना दिलासा मिळाला नाही. पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असंही हायकोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळं राणेंना काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेवार आता परवा म्हणजेच २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी हे राणे यांची बाजू मांडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT