पी. चिदंबरम Sakal
देश

Saradha Chit Fund: पी. चिदंबरम यांना ईडीचा मोठा झटका! पत्नीची कोट्यवधींची संपत्ती जप्त

नलिनी चिदंबरम यांच्यासह इतर मान्यवरांची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीनं मोठा झटका दिला आहे. शारदा चीट फंड घोटाळाप्रकरणी त्यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. याचबरोर इतरही अनेक मान्यवरांच्या जवळच्या नातेवाईकांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. (Saradha Chit Fund P Chidambaram has a big attack of ED Wife property crores seized)

ईडीनं शुक्रवारी सांगितलं की, "पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, सीपीएमचे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री अंजान दत्ता यांच्या कंपनीची एकूण सहा कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे"

केंद्रीय तपास एजन्सीनं एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, "पीएमएलए कायद्यांतर्गत कोर्टानं ३.३० कोटी रुपयांची चल संपत्ती आणि तीन कोटी रुपयांची अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपत्तींवर इतर लोकांची मालकी होती. जी शारदा समुहानं फसवून ताब्यात घेतली आहे.

या संपत्तीच्या लाभार्थींमध्ये नलिनी चिदंबरम, देवव्रत सरकार (ईस्ट बंगाल क्लबचे अधिकारी), देबेंद्रनाथ बिस्वास (माजी आईपीएस अधिकारी आणि माजी सीपीएम आमदार), अनुभूती प्रिंटर आणि प्रकाशन यांचा समावेश आहे. अनुभूती प्रिंटर आणि प्रकाशन कंपनीचे मालकी हक्क आसामचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद दत्ता यांच्याकडं होतं.

आत्तापर्यंत ६०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त

शारदा चीट फंड मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण सन २०१३ पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामध्ये शारदा समुहाद्वारे कथीत चीटफंड घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीनं म्हटलं की, या समुहाच्या कंपनीद्वारे जमवण्यात आलेली एकूण संपत्ती २,४५९ कोटी आहे. यामध्ये जवळपास १,९८३ कोटी रुपये जमाकर्त्यांना अद्याप द्यायचं आहे. ईडीनं याप्रकरणी आत्तापर्यंत ६०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT