New Parliament Building Inauguration
New Parliament Building Inauguration Esakal
देश

New Parliament Building Inauguration: संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरूंकडून मंत्रोच्चार आशीर्वाद

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला असून काहींनी बहिष्कारही घातला आहे. (Latest Marathi News)

परंतु मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवन याने झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सेंगोल'समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीयांकडुन प्रार्थना करण्यात आली आहे.

संसदेच्या नवीन इमारतीत सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदि नेते उपस्थित आहेत. यावेळी बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आदि सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडत आहे.(Latest Marathi News)

देशात सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. याचा प्रत्यय आजही दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Loksabha election 2024 : प्रचारसाहित्य घेऊन पोलिंग एजंट मतदान केंद्रात, शिरुरमधल्या मांजरी केंद्रातील प्रकार, कोल्हेंचा आरोप

CBSE 12th result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर!

Lok Sabha Elections 2024: "मला त्यात शून्य इंटरेस्ट, पण कोणाला मत द्यायचं हे..."; राजकारणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला सुबोध भावेचं उत्तर

Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत शेअर बाजारात गोंधळ; 2014 आणि 2019मध्ये कशी होती मार्केटची स्थिती ?

बारामतीमध्ये घडतंय काय ? EVM ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही बंद, शरद पवार गटाकडून तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT