Satyapal Malik esakal
देश

फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात 300 कोटींची ऑफर; राज्यपालांची चौकशी होणार

सकाळ डिजिटल टीम

'या' दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्यावर 'लाच' दिल्याच्या आरोपाची आता सीबीआय (CBI) चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनानं (Jammu and Kashmir Government) सीबीआयकडं या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केलीय.

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना युनियन आणि बड्या औद्योगिक घराण्यांच्या फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात 300 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत सौदे रद्द केले होते, असं मलिकांनी नमूद केलंय.

सत्यपाल मलिक काय म्हणाले होते?

मलिकांनी सांगितलं होतं की, मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल झालो, तेव्हा माझ्याकडं दोन फाईल्स आल्या होत्या. एका फाईलमध्ये अंबानींचा (Ambani) समावेश होता, तर दुसरी आरएसएसचा वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधित होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणवायचे. ज्या विभागांच्या या फायली होत्या, त्यांच्या सचिवांनी या फायलींमध्ये गडबड असल्याचं सांगितलं होतं आणि सचिवांनीही त्यांना या दोन्ही फायलींमध्ये 150-150 कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती; पण मी या दोन फायलींशी संबंधित करार रद्द केला, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे (Meghalaya) राज्यपाल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT