Saurabh alias Mohammed Saleem father says Zakir Naik agent converted my son Saurabh to Saleem  
देश

Zakir Naik : झाकीर नाईकमुळे माझा सौरभ 'सलीम' बनला…; दहशतवाद्याच्या पित्याचा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

कट्टरपंथी संघटना हिजबुल-तहरीरशी संबंधत असल्याच्या आरोपाखाली भोपाळ आणि हैद्राबाद येथून १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या १६ जणांमध्ये एक सौरभ उर्फ मोहम्मद सलीम याचा देखील समावेश आहे. मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने आरोपींना अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात सहभाग असल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले आहे. दरम्यान सौरभ उर्फ मोहम्मद सलीम याच्या वडीलांनी या प्रकरणात धक्कादायक अनेक खुलासे केले आहेत.

या प्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक प्रोफेसर आणि जिम ट्रेनरचा समावेश आहे. प्रथमदर्शनी यांचा कथितपणे लव्ह जिहाद आणि धर्मांतरांच्या प्रकरणांमध्ये यांचा सहभाग होता.

यानंतर सौरभचे वडील अशोक राज वैद्य यांनी एएनआयला आपल्या कुटुंबाबद्दल माहिती देताना सौरभला कशा प्रकारे इस्लाम स्वीकारण्यासाठी अमिष दाखवण्यात आले आणि कसे त्याचे नाव बदलून ते मोहम्मद ठेवण्यात आलं याबद्दल माहिती दिली.

सौरभचे वडील अशोक वैद्य यांनी सांगितलं की, आमच्या कुटुंबात आम्ही मुलांना त्यांचा जीवनसाथी इतर धर्मातील निवडण्याची मुभा देतो आणि आम्ही याला धर्मांतर म्हणत नाहीत.

त्यांना सौरभ इस्लाम स्वीकरत असल्याचे कधी लक्षात आले असे विचारण्यात आल्यानंतर वैद्य यांनी सांगितलं की, मी पहिल्यांदा सोरभच्या हलचाली आणि तर्क २०२१ मध्ये पाहीले. तो कुटुंबातील कार्यक्रम आणि धार्मिक सणांपासून दूर राहू लागला. काही काळानंतर त्याच्या पत्नीनेही अस्लामिक कपडे घालण्यास सुरुवात केली. तेव्हा मी त्याला काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

वैद्य पुढे म्हणाले की, मी सौरभला घर सोडण्यास सांगितले , तसेच संपूर्ण प्रकरण पोलीसांना कळवले. मात्र, सौरभने स्वतःच्या इच्छेने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आढळून आल्याने कोणतीही कारवाई करण्यास पोलीसांनी नकार दिला.

झाकीर नाईकच्या एजंटने सौरभला मोहम्मद सलीम बनवलं

सौरभच्या वडीलांनी सांगितलं की एक डॉक्टर कमान नावाचा व्यक्ती सौरभच्या कॉलेजच्या दिवसात त्याच्यासोबत राहात असे. नंतर कळलं की डॉ. कमाल हा वादग्रस्त धर्म उपदेशक झाकीर नाईकचा एजेंट होता. आणि त्याला अटक करण्यात आले. त्याने मझ्या मुलाला इस्लामिक गोष्टींची शिकवण दिली.

वैद्य पुढे बोलताना म्हणाले की, सौरभ त्याच्या कंप्युटरवर झाकीर नाईकचे भाषणं पाहात असे. मला त्याच्या खोलीतून अनेक इस्लामिक पुस्तके देखील सापडली. तसेच टीव्हीवर सीरीयाच्या बातम्या पाहून सौरभ इस्लामबाबत बोलत असे. त्याने अनेक दिग्गज लोकांनी आयोजित केलेल्या इस्लामिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला होता असेही वैद्य यांनी सांगितलं.

वैद्य यांनी पुढे सांगितले की, झाकीर नाईकच्या भाषणांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी यासाठी तात्कालिन काँग्रेसच्या केंद्र सरकारला पत्र देखील लिहीलं होतं. त्यांच्या अटकेत असलेल्या मुलाबद्दल बोलताना वैद्य यांनी सांगितलं की त्यांना वाटतं की त्यांचा मुलगा सौरभ हा कुठल्याही दहशतवादी कारवाईत सहभागी नव्हता. मात्र त्यांनी जर सौरभने इस्लाम सोडला नाही तर त्यांचं कुटुंब सौरभला परत त्यांच्या घरात येण्याची परवानगी देणार नसल्याचं देखील ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT