Rahul Gandhi and Uddhav Thackeray 
देश

Veer Savarkar Row: सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, खुद्द मी राहुल गांधींशी बोललो; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

सकाळ डिजिटल टीम

Veer Savarkar Row- विनायक सावरकर यांच्यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेला वाद आता संपुष्टात आला आहे. सावरकर हे आमचे आदर्श असून त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

शिवसेनेने बुधवारी हा प्रश्न सुटला असून भाजपविरोधातील लढाईत विरोधी पक्षांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार संजय राऊत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, 'आमच्यासाठी हा विषय संपला आहे. हे प्रकरण मिटले आहे. याबाबत मी राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे. " याबाबत जनसत्ताने वृत्त दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही दोन दिवसांपूर्वी सावरकरांबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीला आम्ही उपस्थित नव्हतो. पण महाराष्ट्रात तसेच देशात विरोधकांची एकजूट आहे आणि राहील.

आम्ही मांडलेल्या आक्षेपाचा परिणाम स्पष्ट झाला आहे. आम्ही आज विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू आणि संसदेतील आंदोलनातही सहभागी होऊ.

राहुल गांधी यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यास पक्षाची भूमिका काय असेल, असे विचारले असता राऊत म्हणाले, 'राहुल गांधी यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यास काय करायचे ते पाहू. पण ते हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT