Supreme Court esakal
देश

Lakhimpur Kheri : माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास, SC चा प्रस्ताव

भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी, एक पत्रकार आणि अन्य तीन जण ठार झाले होते. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी घेण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेल्या अहवालावर न्यायालयाने नाराजी दर्शवली असून आणखी काही साक्षीदारांचा तपास केल्याशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी उत्तर प्रदेश सरकारतर्फे न्यायालयाला सांगितले, की लॅबचे अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येतील. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला विचारले की फक्त आशिष मिश्रा यांचाच फोन का जप्त करण्यात आला, इतरांचे फोन अद्याप जप्त का केले नाही? असा सवाल विचारला. या घटनेमध्ये पुराव्याची अफरातफर होऊ नये म्हणून तपासावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाची नियुक्त करत असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती राकेश कुमार जैन (निवृत्त) किंवा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित सिंग (निवृत्त) लखीमपूर खेरीच्या तपासावर देखरेख करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचविले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील लखीपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनामध्ये चारचाकी गाड्या घुसवून शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशसह देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलासह काही जणांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयाने देखील या घटनेची दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश : एकनाथ शिंदे

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT