CBI esakal
देश

शिक्षक भरती घोटाळा: कुलगुरूंच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

भट्टाचार्य 2014 ते 2018 पर्यंत SSC चे अध्यक्ष होते.

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने शिक्षक भरती घोटाळाची चौकशीसाठी बुधवारी सिलीगुडी उत्तर बंगाल विश्वविद्यालयाचे कुलगुरू सुबिरेस भट्टाचीर्य यांच्या कार्यालयावर वर धाड टाकली आहे. CBI ने कोलकत्ता मधील एका बिल्डीगला सील केले आहे. या घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांचे विश्वासू असलेले,आणि त्यांच्या मंत्रीमंडळात असलेले माजी मंत्री पार्थ चाटर्जी ED ने अटक केली आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात भट्टाचार्य यांचे नाव आले होते. अहवालात दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगाल सरकार चालवल्या जाणाऱ्या किंवा अनुदानित संस्थांमध्ये शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींवर बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. भट्टाचार्य 2014 ते 2018 पर्यंत SSC चे अध्यक्ष होते.

सीबीआय च्या 12 सदस्यीय पथकाने सिलीगुडी येथील एनबीयू कुलगुरूंच्या कार्यालयावर धाड टाकली. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही छापे टाकले आणि काही कागदपत्रे आणि त्याचा मोबाईल जप्त केला." दुसर्‍या पथकाने भट्टाचार्य यांचे कोलकात्याच्या बांसड्रोनी भागातील अपार्टमेंट सील केले. मात्र, तो आता सिलीगुडी येथे राहतो. NBU च्या कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

न्यायालयाने पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सोबती अर्पिता मुखर्जी यांना 31 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी कोलकाता शहर सत्र न्यायालयाने दोघांनाही 18 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने या दोघांना 25 जुलै रोजी अटक केली होती. अर्पिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ईडीने 50 कोटींहून अधिक रोकड आणि सोने जप्त केले होते. हे पैसे पार्थचे असल्याची कबुली अर्पिताने चौकशीदरम्यान दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंना एकच दिवस परवानगी मिळालीय, सरकार काय करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, ''आम्ही....''

PCMC News : काळेवाडी भुयारी मार्गातील अस्वच्छता आणि असुरक्षा; महिलांची सुरक्षा धोक्यात

Manoj Jarange News: भीम आर्मीचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Himachal Flood: जोर ओसरूनही जनजीवन विस्कळित; हिमाचलमध्ये रावी नदीला अचानक पूर, वाराणसीत गंगाआरतीला अडथळा

Gauri festival : गणेशोत्सवानंतर आता गौराईंची तयारी; कापडी फुलांसह ज्वेलरी सेट खरेदीसाठी बाजारात गर्दी

SCROLL FOR NEXT