Seat reserved for God Shankar in Kashi Mahakal express 
देश

भगवान शंकरही आता रेल्वेतून प्रवास करणार!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तुम्ही कधी रेल्वेमध्ये देवासाठी आरक्षित सीट बघितलंय का? नाही ना... तर मग आता तुम्हाला एका रेल्वेत चक्क भगवान शंकरांसाठी रिझर्व्ह जागा दिसेल. काशी-महाकाल एक्स्प्रेसमध्ये चक्क भगवान शंकरांसाठी एक सीट आरक्षित ठेवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी महाकाल या एक्स्प्रेसचे उद्धाटन केले. 

काशी महाकाल ही एक्स्प्रेस दोन राज्यांतील तीन ज्योतिर्लिंगांची यात्रा करेल. या एक्स्प्रेसमध्ये एक जागा ही कायमसाठी 'भोले बाबां'च्या नावावर रिझर्व्ह करण्यात आली आहे. ही रेल्वे इंदूरजवळील ओंकारेश्वर, उज्जैनमधील महाकालेश्वर आणि काशीतील काशी विश्वनाथ येथे प्रवास करेल. मोदींनी ही रेल्वे सुरू केल्याने शंकर भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

रेल्वेतील कोच क्रमांक बी ५ मधील ६४ क्रमांकाची सीट ही भगवान शंकरांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितले. तसेच कोणत्याही देवासाठी जागा अरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सीटवर भगवान शंकरांचा फोटो ठेवण्यात आला असून, लाल कापड टाकण्यात आले आहे. जेणेकरून ती जागा देवासाठी आहे असे प्रवाशांना कळेल. ही जागा कायम महाकालसाठी आरक्षित ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. ही रेल्वे उत्तर प्रदेशमधील वाराणसीहून मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये आठवड्यातून तीन वेळा मार्गक्रमण करेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Kas Plateau Flower Season : कास तलाव ते वजराई धबधबा! वीकेंडला साताऱ्यात पर्यटकांची पसंती; 'चवर' फुलांनी बहरलं पुष्प पठार, हंगाम कधी होणार सुरु?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Health Tips: सतत ब्लड टेस्ट करताय? अनावश्यक रक्त चाचण्यांमुळे वाढतोय ॲनिमिया आणि मानसिक तणाव!

SCROLL FOR NEXT