jalgaon
jalgaon  
देश

Corona ज्या वेगानं आला त्याच वेगानं जाणार, तज्ज्ञांचं मत

नामदेव कुंभार

Corona News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (second wave ) देशात हाहाकार माजवलाय. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. दररोज येणारे आकडे पाहून नागरिंकामध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोना (covid-19 ) महामारी कधी निरोप घेणारं? असं प्रत्येकाला वाटतेय.. याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. मात्र, कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? याबाबतचं तज्ज्ञांनी ( expect ) सांगितलं आहे. ज्या वेगानं कोरोनाची दुसरी लाट आली त्याच वेगानं जाईल, असा अंदाज तज्ज्ञां व्यक्त केला आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या सर्वोच्च पातळीवर (tipping point) आहे. थोड्या दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. (second wave of covid-19 come down as fast as it went up says expect )

दुसऱ्या लाटोत (second wave ) कोरोनाचे (covid-19 ) रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येचा वेग आणि दर पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्रमाणात आहे. नवनवीन कोरोना स्ट्रेनमुळे हर्ड इम्यूनिटीचा फर्मुलाही अपयशी ठरतोय. त्यातच भर म्हणून लसीकरणचा वेगही मंदावलाय. इतर देशात कोरोनाची (covid-19 ) दुसरी लाट(second wave ) जास्त कालावधीपर्यंत राहिली नव्हती. पण भारतातील परिस्थिती वेगळी असल्याचं दिसतेय. दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संक्या नवनवे विक्रम करत आहे. 5 मे 2021 (बुधवार) रोजी देशात 4.13 लाख नवीन रुग्ण आढळलेत आणि 3980 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेल्या वेगानेच परत जाणार असल्याचं तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, दुसरी लाट नेमकी ओसरणार केव्हा ओसरणार याचं उत्तर तज्ज्ञांकडेही नाही. मात्र, काही आकडेवारीनुसार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो....

कोरोना (covid-19 )महामारीचा वेगवेगळ्या लाटेचा विविध भागात अभ्यास केला जाऊ शकतो. काही दिवसांतच रुग्णवाढ दुपट्ट होत असेल तर कोरोना सर्वोच्च पातळीवर असल्याचं म्हटलं जाईल. जेव्हा कोरोनाचे रुग्ण कमी होतील तेव्हा दुपटीचा वेगही मंदावेल. त्यानंतर खूप कमी कालावधीपर्यंत खूप जास्त कालावधीपर्यंत कोरोनाचा वेग स्थिर राहतो. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिका याच (भारत सध्या असलेल्या) परिस्थितीतून गेली. जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोना आटोक्यात आला. भारतामध्ये मार्च महिन्याच्या मध्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग वाढला. महिनाभरात दुसऱ्या लाटेनं पहिल्या लाटेचे सर्व विक्रम मोडीत काढले. मृत्यूची संख्याही पहिल्या लाटेपेक्षा जास्त झाली. तीव्र घसरणीच्या सिद्धांतानुसार, महामारीच्या दुसऱ्या लाटेत (second wave ) नवीन कोरोना (covid-19 ) रुग्णांमध्ये घसरणही वेगात होईल. पण महत्वाचं म्हणजे, दुसरी लाट सर्वोच्च पातळीवर केव्हा पोहचेल. या कालावधीतच लसीकरण वेगानं व्हायला हवं आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगायला हवी.

इस्राइलनं कोरोनाच्या (covid-19 ) दुसऱ्या लाटेवर यशस्वीरित्या मात केली. एप्रिलपासून येथे 200 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत आहेत. याचं सर्व श्रेय वेगानं होणाऱ्या लसीकरणाला जातं. जवळपास 59 लोकांनी लस घेतली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोना पूर्णपणे संपणार नाही. पण रुग्णसंख्येत मोठी घसरण येते. त्यानंतर सावधानता बाळगल्यास दररोज रुग्णांमध्ये घट दिसून येईल. दरम्यान, पहिल्या लाटेवर वर्चस्व मिळवल्यानंतर भारतानं सावधानता बाळगली नाही. त्यामुळे देशात वेगानं दुसरी लाट (second wave ) आली. निर्बंध हटवल्यामुळे भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढली. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कोणताही काळजी घेतली नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासारख्या बाबींना प्राधन्य दिलं नाही. त्यामुळेच भारतामध्ये कोरोना महामारीनं पुन्हा एकदा मूळ पकडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT