देश

PM Modi Security Breach : कर्नाटकात PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, तरुणाचा थेट ताफ्यात प्रवेश! VIDEO आला समोर

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Security Breach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. नरेंद्र मोदी आज (शनिवार) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांचा ताफा जेव्हा दावणगेरवरुन जात होता तेव्हा एका तरुणाने थेट ताफ्यात प्रवेश केला. त्यामुळे एकच भंबेरी उडाली. तो तरूण नरेंद्र मोंदीच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले आहे.

तरुणाची चौकशी केली जात आहे. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. जानेवारीत, कर्नाटकातील हुबळी येथे पीएम मोदींच्या रोड शो दरम्यान एक युवक त्यांच्या जवळ आला होता.

कर्नाटकमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर दावणगेर येथे विजयी संकल्प यात्रा आयोजीत करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्री मोदी यांनी येथील प्रचार सभेला संबोधित केले.

मात्र त्यापूर्वी त्यांनी रोड शो केला. यावेशी एका तरूणाने थेट त्यांच्या ताफ्यात प्रवेश केला. उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जेव्हा पीएम मोदींचा ताफा रस्त्यावरून जात आहे, तेव्हा मोठ्याने 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या जात आहेत. लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून घोषणा देत आहेत, त्याच दरम्यान चेक शर्ट आणि निळी जीन्स घातलेला एक तरुण वेगाने मोदींच्या ताफ्यात घुसला आहे. यावेळी त्याला सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी ११ गुन्ह्यांची नोंद; दोन कोटी १६ लाखांची ऑनलाइन लूट!

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT