Indian army soldier
Indian army soldier Sakal
देश

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, रेड अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : दहशवादी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. यानंतर श्रीनगरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार अशा प्रकारच्या हल्ल्यासाठी दहशतवादी स्टिकी बॉम्बचा वापर करु शकतात असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाने या अलर्टला A+ ग्रेडिंग देण्यात आले असून, सुरक्षा दल आणि रहिवाशांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

गुप्तचर विभागाच्या अलर्टनुसार, दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य हे बटामालू क्षेत्र असून, यासाठी स्टिकी बॉम्बचा वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, या अलर्टनंतर सर्व वरिष्ठ अधिकारी, चालक, सहचालक आणि वाहनातील शिपाई यांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच सुरक्षा दल आणि रहिवाशांना गरज नसल्यास बटामालू परिसरात न जाण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.

लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर पोलिसांनी आज सकाळी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर/टीआरएफच्या 2 स्थानिक संकरित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यासोबतच त्यांच्याकडून 15 पिस्तूल, 30 मॅगझिन, 300 राऊंड आणि 1 सायलेन्सरसह अनेक आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT