Gas Cylinder Sakal
देश

गॅस सिलिंडरचे दर पहा कोठे किती आहेत

इंधन दरवाढीने आधीच नागरिक त्रस्त असताना आज पुन्हा गॅसच्या किमतीचा दणका ग्राहकांना बसला आहे.

एएनआय

नवी दिल्ली - इंधन दरवाढीने (Fuel Rate) आधीच नागरिक त्रस्त असताना आज पुन्हा गॅसच्या (Gas Cylinder) किमतीचा दणका ग्राहकांना (Customer) बसला आहे. देशातील प्रमुख तेल कंपन्‍यांनी (ओएमसी) विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढ केली.

या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० रुपये होणार आहे. गेल्या दोन आठवड्यांत झालेली ही दुसरी वाढ आहे.

‘ओएमसी’कडून दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला गॅस सिलिंडरच्या सुधारित किंमत जाहीर केली जाते. त्यानुसार आज कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमत २५ रुपयांनी वाढविली. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅसबरोबरच १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरही ७५ रुपयांनी महागला आहे. दिल्लीत या सिलिंडर किंमत एक हजार ६९३ रुपये झाली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरील नोंदीनुसार तेल कंपन्यांनी २५ ऑगस्ट रोजी गॅसची किंमत २५ रुपयांनी वाढविली होती. त्यापूर्वी १ जुलैला २५ रुपये ५० पैसे एवढी दरवाढ झाली होती.

नऊ महिन्यांत १९० रुपये वाढ

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत यावर्षी १ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने प्रत्येक महिन्याला दरवाढ करीत एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदान बंद केले आहे. घरगुती गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची (१४.२ किलो) किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलिंडर होती.

हाच ‘विकास’ आहे का?

घरगुती गॅस सिलिंडरची किमतीत वाढ झाल्याने काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपच्या ‘सबका विकास’ या घोषणेचा उल्लेख केला. ‘‘पंतप्रधान, तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विकासाचे दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे तुमच्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत भर पडणे आणि दुसरे म्हणजे सामान्‍यांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणे,’’ अशी टीका त्यांनी केली. ‘‘हाच ‘विकास’ असेल तर अशा ‘विकासा’ला आता सुटीवर पाठविण्याची वेळ आली आहे,’’ असा खोचक सल्लाही प्रियांका गांधी यांनी दिला.

देशातील प्रमुख शहरांमधील १ सप्टेंबर २०२१ रोजी सिलिंडरची सर्वसाधारण किंमत (रुपयांत)

८८५ - दिल्ली

८८५ - मुंबई

८८८ - पुणे

९११ - कोलकता

९०१ - चेन्नई

९२३ - लखनौ

८८९ - जयपूर

९७५ - पाटणा

९१३ - इंदूर

८९२ - अहमदाबाद

पेट्रोल -डिझेलच्या दरात घट

दरम्यान, अनेक दिवस अपरिवर्तित राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत आता १०१.३४ रुपये आणि मुंबईत १०७.३९ रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ८८.७७ रुपये आणि मुंबईत ९६.३३ रुपये प्रतिलिटर आहे.

जनतेला उपाशी पोटी झोपण्यास भाग पाडणारे मात्र त्यांच्या मित्रांच्या सावलीत आराम करीत आहेत. या अन्यायाविरोधात देश एकत्र येत आहे.

- राहुल गांधी, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT