देश

Seema Haidar: आणखी एक सीमा हैदर? जयपूरच्या विमानतळावरुन पाकिस्तानी मुलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

राजस्थानमध्ये १६ वर्षाच्या एका मुलीला ताब्यात घेण्यात आलंय. जयपुर विमानतळावर अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं. ही मुलगी पाकिस्तानला जाण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी आली होती.

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानमध्ये एका १६ वर्षीय पाकिस्तानी मुलीला ताब्यात घेण्यात आलंय.जयपुर विमातळावर अधिकाऱ्यांनी शेजारील राष्ट्राच्या या १६वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतलं. ही किशोरवयीन मुलगी पाकिस्तानला जाण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी आली होती. पण तिच्याकडे ना पासपोर्ट होतं ना भारताचा व्हिजा.

या मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमा हैदरचं प्रकरण देखील माध्यमांच्या प्रकाशझोतात आहे. सीमा देखील बेकायदेशीर पद्धतीने भारतात आली होती. मात्र, जयपुरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मुलीची गोष्ट सीमा हैदरपेक्षा जरा वेगळी आहे.

पोलीसांनुसार, १६ वर्षीय या मुलीची ओळख गझल परवीन अशी पटली आहे. गझल लाहोरची राहणारी आहे. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की ती मागील ३ वर्षांपासून भारतात राहत आहे. गझल तीन वर्षांपूर्वी आपल्या मावशीसोबत भारतात आली होती. ती आणि तिची मावशी श्रीमाधोपुरमध्ये राहत होत्या.(Latest Marathi news)

शुक्रवारी (दि.२८ जुलै) विमानतळावर पोहोचली. तिला पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी तिच्यासोबत दोन पुरुष देखील होते. गझल आता पोलीसांच्या ताब्यात आहे.

मावशीची देखील होणार चौकशी

जयपुर विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रमुख दिकपाल सिंह यांनी सांगितलं की पाकिस्तानी मुलीबरोबरचं आणखी दोन लोकांना पकडण्यात आलंय, जे या मुलीसोबत आले होते. या मुलीने पोलिसांना सांगितले की तीन वर्षांआधी ती विमानाने भारतात आली होती.

मात्र, तिची मावशी आणि ती भारतात कागदपत्रांशिवाय कसे आले, याबद्दल त्या मुलीला काहीही माहिती नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुलीची चौकशी अजून सुरु आहे. या प्रकरणात मावशीची देखील चौकशी केली जाणार आहे.(Latest Marathi news)

काही दिवसांपासून भारतामध्ये सीमा हैदरचं देखील प्रकरण गाजतं आहे. सीमा हैदरने आपल्या चार मुलांसोबत भारतात प्रवेश केला होता. तिने एका भारतीय पुरुषाशी विवाह करुन त्याच्या घरात राहयला देखील सुरुवात केली. सचिन नावाच्या भारतीय व्यक्तीशी तिची ओळख ऑनलाईन गेम खेळताना झाली होती. त्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण सुरु झालं आणि ती थेट आपल्या मुलांना घेऊन भारतात आली.(Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT